Kiara Advani
Kiara Advani eSakal
Premier

Kiara Advani : बॉलिवूड स्टार बनण्यापूर्वी कियारा करायची 'या' क्षेत्रात नोकरी; तुम्हाला माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

Kiara Advani First Job : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्तम अभिनयाबरोबरीनेच डान्स स्किल्समुळेही चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीच्या प्रत्येक फिल्मची चर्चा होते. सोशल मीडियावरील तिचे फोटोशूट्सही चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर तिची एक क्लिप व्हायरल होत असून, या व्हिडीओमध्ये तिने अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी ती काय काम करायची हे रिव्हील केलं आहे.

रेडिओ सिटीला कियाराने दिलेल्या मुलाखतीची (Kiara Advani Interview) क्लिप व्हायरल होत असून यात तिने तिच्या पहिल्या जॉबविषयी सांगितलं. "अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी मी माझ्या आईच्या शाळेत तिच्यासोबत काम करायचे. माझी आई लहान मुलांसाठी शाळा चालवते. तिची नर्सरी आहे. त्यामुळे मी लहान मुलांना गाणी शिकवायचे, लिहायला शिकवायचे आणि त्यांचे डायपर्सही बदलायचे. मी हे सगळं केलंय. त्यामुळे 'गुड न्यूज' आणि 'कबीर सिंग'मध्ये मला गरोदर स्त्रीची भूमिका साकारताना काहीच अडचण आली नाही. कारण या सगळ्याचा अनुभव मी आधीच आईच्या शाळेत घेतला होता."

वर्कफ्रंट

कियारा या वर्षात अनेक प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'गेम चेंजर' या सिनेमातून ती तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करतेय. राम चरण सोबत ती या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे. तर 'वॉर 2' या यशराज स्टुडिओजच्या सिनेमातही ती दिसणार आहे. ही एक स्पाय फिल्म असेल. तसंच ती 'डॉन 3' या सिनेमात काम करणार असल्याची चर्चा असून रणवीर सिंग या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. तर केजीएफ स्टार यश सोबत ती 'टॉक्सिक' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात करीना कपूर खानचीही मुख्य भूमिका आहे. (Kiara Advani upcoming films)

कियाराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी (Siddharth Malhotra) फेब्रुवारी 2023 मध्ये लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर ही जोडी लोकप्रिय असून त3 शेअर करत असलेले एकमेकांचे फोटोज कायमच चर्चेत असतात. शेरशाह या सिनेमानंतर ही जोडी पुन्हा एकत्र एका प्रोजेक्टमध्ये कधी काम करणार याची चाहते वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT