kranti redkar sakal
Premier

Kranti Redkar: दुसऱ्या जातीत लग्न केल्यावर आयुष्यात काय बदल झाला? क्रांती रेडकर म्हणाली, 'पहिल्याच दिवशी...

Kranti Redkar Family:लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एका मुलाखतीत टिपूच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kranti Redkar: 'जत्रा' चित्रपटातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांतीने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. ती उत्तम नृत्यांगना देखील आहे. क्रांती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खासकरून मुलींचे व्हिडिओ बनवून चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा क्रांती चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. नुकतीच क्रांतीने कांचन अधिकारी यांच्या 'बातो बातों में' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे.

या मुलाखतीत कांचन यांनी क्रांतीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या, 'लग्नाआधी आपण आईवडिलांसोबत राहत असतो. जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा अचानक सगळं बदलतं. तू पण वेगळ्या जातीत लग्न केलंस, त्यामुळे एका दिवसात आजूबाजूचं संपूर्ण वातावरण बदलून जातं. आदल्या दिवशी तुम्ही क्रांती रेडकर असता, आणि जसं लग्न होतं तशा तुम्ही कोणाच्या तरी काकी, मामी बनता. काकी, मामी अशी हाक आपल्याला ऐकू येते. तर तुझ्या आयुष्यातील लग्नानंतरचा पहिला दिवस कसा होता?'

काय म्हणाली क्रांती?

यावर उत्तर देताना क्रांती म्हणाली, 'माझा लग्नानंतरचा पहिला दिवस अगदी सर्वसाधारण होता. कारण आम्ही फक्त दोघेच राहतो. आम्ही विभक्त कुटुंबात राहतो. नणंद, सासूसासरे, मी आणि समीर सगळे वेगळे राहतो. मी आणि समीर कॉलेजपासूनचे मित्र आहोत. आम्ही रियाचे विद्यार्थी होतो. तो पाच वर्ष माझ्या वर्गात होता. पण तेव्हा आम्ही असं काही खास बोललो नव्हतो. मला फक्त तो माझ्या वर्गात आहे इतकंच माहित होतं. पण कधी बसून गप्पा वगैरे मारल्या असं फारसं झालं नाही.'

पुढे क्रांती म्हणाली, 'आता नवरा-बायको झालो असलो तरी आम्ही मैत्री विसरलेली नाही. मी कॉफी बनवली आणि दोन कप आणून ठेवले. कॉफी पिऊन झाल्यावर तो कप उचलून घेऊन जातो, हे आमच्यातील समीकरण आहे. तो कधीच ऑर्डर सोडत नाही, त्यामुळेच मी बिघडली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संयुक्त कुटुंबाचं प्रेशर कधीच माझ्यावर आलेलं नाही.' क्रांती समीर यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभी राहिलेली दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Flood : पंतप्रधान मोदी करणार पंजाबच्या पूरग्रस्त भागाचा दौरा; २००० गावे बुडाली, ४६ जणांचा मृत्यू, लाखो हेक्टर शेतीचे नुकसान

Sanjay Raut : दसऱ्या मेळाव्याला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं; नेमकं काय म्हणाले?

मार्केटमध्ये झाली गेमचेंजर मोबाईलची एन्ट्री; Realme Neo 7 Turbo AI झाला लाँच, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त...

Ganpati Visarjan 2025 Live Updates : समुद्राला भरती आल्याने लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी

'मला आवडणाऱ्या लोकांना मी आवडत नाही' लग्न न करण्यावर ऋतुजा बागवे म्हणाली...'जोडीदार नसण्याचं कारण....'

SCROLL FOR NEXT