salman khan  sakal
Premier

हेल्मेट घालू नका, बिनधास्त सिगारेट ओढत... सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना काय होत्या बिश्नोईच्या सूचना? ऑडिओ क्लिप समोर

Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये आता एक ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल होत आहे.

Payal Naik

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. या गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोन अनोळखी व्यक्तींनी सलमानच्या बांद्रा येथील घरावर गोळीबार केला होता. त्यानंतर दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी नुकताच सलमान खानचा जबाब नोंदवला होता. आता त्याप्रकरणी नवी माहिती समोर येते आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये लॉरेन्स बिष्णोई याने गोळीबार करणाऱ्यांना काय सूचना दिल्या होत्या हे समोर आलं आहे.

काय होत्या सूचना?

पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये एक ऑडिओ क्लिपदेखील आहे ज्यात लॉरेन्स बिष्णोईचा लहान भाऊ अनमोल बिष्णोई गोळीबार करणाऱ्यांना काही सूचना देताना दिसतोय. त्याचा आवाज ऐकू येतोय. या सूचना त्यांना एक दिवस आधी देण्यात आल्या होत्या. या ऑडिओ क्लिपमध्ये अनमोल म्हणतोय, 'तिथे गोळ्या विचार करून एकदम पटापट चालवायच्या आहेत. मग आपल्याला अर्धा मिनिट जरी लागला तरी काही अडचण नाहीये. एक मिनिट लागेल किंवा दीड मिनिट लागेल. काही अडचण नाही. आणि अशा गोळ्या चालावा की सलमान घाबरला पाहिजे. आपल्याला असं दाखवायचं आहे की आपल्याला कशाची भीती नाहीये.'

यात तो पुढे म्हणतो, 'तुम्ही हेल्मेट घालायचं नाही, बिनधास्त दिसण्यासाठी सिगारेट ओढत फायरिंग करा. तुम्ही इतिहास रचणारी माणसं आहात. कशाची भीती बाळगण्याची गरज नाही.' सलमानला घाबरवण्यासाठी आणि मुंबईत दहशत माजवण्याचा दृष्टीने हे काम केलं गेलं होतं. मुंबईत पोलिसांनी गुप्ता आणि पाल यांच्यासह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं असून, त्यात साबरमती कारागृहात बंदिस्त असलेल्या लॉरेन्स, अमेरिका किंवा कॅनडात असलेल्या अनमोल आणि रावताराम स्वामी यांची नावे घेतली आहेत.

नुकताच सलमानने याबद्दल आपला जबाब नोंदवला आहे. त्याने सांगितलं की, 'मला फटाक्यासारखा आवाज आला तेव्हा मी झोपलो होतो. पहाटे 4.55 च्या सुमारास, पोलिस अंगरक्षकाने मला माहिती दिली की आमच्या पहिल्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीत दुचाकीवरून आलेल्या दोन लोकांनी शस्त्राने गोळीबार केला. मला आणि माझ्या कुटुंबाला ,मारण्याचा यापूर्वीही प्रयत्न झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि टोळीने घेतल्याचं मला सोशल मीडियावरून समजलं त्यामुळे, माझा विश्वास आहे की लॉरेन्स बिश्नोई टोळीने माझ्या बाल्कनीत गोळीबार केला.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT