Madhuri Dixit And Ankita Lokhande esakal
Premier

VIDEO: ‘मैं कोल्हापूर से आयी हूँ’ गाण्यावर धकधक गर्ल माधुरी दीक्षित अन् अंकिता लोखंडेचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

Madhuri Dixit And Ankita Lokhande: डान्स दिवाने या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande ) ही माधुरीसाठी खास परफॉर्मन्स करताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Madhuri Dixit And Ankita Lokhande: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही तिच्या अभिनयानं आणि डान्सनं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. सध्या माधुरी ही डान्स दिवाने या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे. या शोमध्ये माधुरी ही वेगवेगळ्या गाण्यावर परफॉर्म करत असते. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमामध्ये माधुरीचे पती श्रीराम लेले यांनी हजेरी लावली होती. यावेळी श्रीराम नेने आणि माधुरी यांनी रोमँटिक डान्स केला. आता डान्स दिवाने या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande ) ही माधुरीसाठी खास परफॉर्मन्स करताना दिसत आहे.

अंकितानं माधुरीसाठी केला खास परफॉर्मन्स

माधुरीचा 15 मे रोजी वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अंकितानं एक खास परफॉर्मन्स केला. यामध्ये तिनं माधुरीच्या गाण्यावर डान्स केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या डान्स दिवाने या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अंकिता ही परफॉर्मन्सनंतर माधुरीला म्हणते, “हॅपी बर्थडे टू यू ” त्यानंतर माधुरी ही अंकिताला फ्लाइंग किस देत “लव्ह यू.” म्हणते.

प्रोमोमध्ये दिसत आहे की, ‘मैं कोल्हापूर से आयी हूँ’ या गाण्यावर माधुरी आणि अंकिता या डान्स करतात. "मी नेहमीच तुमची चाहते असेन", असंही अंकिता माधुरीला म्हणते.

पाहा प्रोमो:

1994 मध्ये रिलीज झालेल्या 'अंजाम' या चित्रपटातील 'मैं कोल्हापूर से आयी हूं' या गाण्यावरील अंकिता आणि माधुरी यांच्या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. डान्स दिवानेच्या प्रेमोमधील अंकिता आणि माधुरीच्या डान्सचं अनेकांनी कौतुक केलं.

याआधी देखील माधुरी आणि अंकिता या दोघी डान्स दिवाने या शोमध्ये एकत्र थिरकल्या आहेत. 'एक दो तीन' या गाण्यावर अंकिता आणि माधुरी यांनी डान्स दिवाने या शोमध्ये डान्स केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin: पुतीन यांचे 'हे' चार मित्र, ज्यांच्यामुळे पाश्चिमात्य देशांचं वर्चस्व संपलं; चीनमधून दिला संदेश

Mumbai News: मुंबईत ईद-ए-मिलादच्या मिरवणुकासाठी रस्ते वाहतूक बदल, पाहा पर्यायी मार्ग

Ravindra Jadeja च्या पत्नीनेही दाखवलं खेळाचं कौशल्य; लहान मुलांसोबत खेळली कबड्डी अन् रस्सीखेच; पाहा Video

Thane Crime: तलाठी कार्यालय चोरी प्रकरण! तपासात धक्कादायक खुलासा उघड; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates: दौंड रेल्वे स्थानकावर प्रवाशाला लुटले

SCROLL FOR NEXT