madhuri dixit and karishma kapoor dance on chak dhum dhum song dil toh pagal hai  Sakal
Premier

Madhuri Dixit and Karisma Kapoor Dance : माधुरी दीक्षित-करिश्मा; ‘चक धूम धूम’वर थिरकल्‍या

माधुरी आणि करिश्माने पुन्हा एकदा चित्रपटातील ‘चक धूम धूम’ गाण्यावर डान्स केला. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

माधुरी दीक्षित, शाहरुख खान आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दिल तो पागल हैं’ हा चित्रपट १९९७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने घराघरांत एक वेगळीच जादू निर्माण केली होती. याचे कारण म्हणजे चित्रपटातील प्रत्येक गाणे सुपरहिट ठरले. ‘दिल तो पागल हैं’ मधील सदाबहार गाण्यांनी आजही प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

या गाण्यात करिश्मा आणि माधुरी या दोघींनी जबरदस्त डान्स केला होता. आता तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमधील या लोकप्रिय अभिनेत्री एकमेकींसमोर आल्या आहेत. माधुरी आणि करिश्माने पुन्हा एकदा चित्रपटातील ‘चक धूम धूम’ गाण्यावर डान्स केला. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नुकतेच ‘डान्स दिवाने’ या शोमध्ये करिश्मा कपूरने हजेरी लावली होती.

माधुरी आणि सुनील शेट्टी या शोचे परीक्षक आहेत. यादरम्यान त्यांनी ‘चक धूम धूम’ या गाण्यावर डान्स केला. या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देत चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. ‘एव्हरग्रीन करिश्मा कपूर’ असे एकाने चाहत्याने लिहिले आहे. तर, ‘माधुरीच बेस्ट आहे’, असे दुसऱ्याने म्हटले. या व्हिडीओला अवघ्या एक दिवसात ११ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT