Sabarmati Report Teaser
Sabarmati Report Teaser ESAKAL
Premier

The Sabarmati Report Teaser: "देशाला हादरवून सोडणारी घटना"; 'द साबरमती रिपोर्ट'चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

priyanka kulkarni

The Sabarmati Report Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राशि खन्ना (Raashii Khanna) आणि विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) मुख्य भूमिकेत असलेल्या 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये विक्रांत आणि राशि हे दोघे पत्रकाराची भूमिका साकारताना दिसत आहेत.

'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाची कथा 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित आहे. टीझरमध्ये पत्रकाराच्या भूमिकेत असणारा विक्रांत मेस्सी हा साबरमती एक्स्प्रेसच्या घटनेबद्दल बोलताना दिसत आहे. तसेच विक्रांत या टीझरमध्ये हिंदी भाषेबद्दल देखील बोलताना दिसत आहे. तो हिंदी भाषेबद्दल म्हणतो, - 'हां, मैं हूं हिंदी वाला और मेरे जैसे इस देश में करोड़ों हैं, जो हिंदी भी बोलते हैं और समझते हैं. लेकिन मुझे पूरा विश्वास है कि एक वक्त ऐसा आएगा जब हिंदी हमारी पहचान बनेगी. और तब इंडिया बनेगा भारत.'

विक्रांतनं शेअर केला टीझर

विक्रांत मेस्सीनं 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, "देशाला हादरवून सोडणारी घटना. भारतीय इतिहास कायमचा बदलून टाकणारी घटना घडली."

पाहा टीझर:

कधी रिलीज होणार 'द साबरमती रिपोर्ट'? (The Sabarmati Report Release Date)

बालाजी मोशन पिक्चर्सने सादर केलेला आणि ए विकीर फिल्म्स प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मित 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट 3 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले आहे. शोभा कपूर, एकता कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन हे त्याचे निर्माते आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kumar Modi: बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला! सुशील कुमार मोदी यांचं निधन

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

लोकशाहीसाठी राज्यभर राबवली 'निर्भय बनो' मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले वंचित; कारण काय?

GT vs KKR IPL 2024 : पावसाने गुजरातला बुडवलं; प्ले ऑफच्या रेसमधून पडली बाहेर, केकेआर मात्र फायद्यात

Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT