The Sabarmati Report: 'साबरमती एक्स्प्रेस का जलना दुर्घटना नहीं थी'; विक्रांत पत्रकाराच्या भूमिकेत, 'द साबरमती रिपोर्ट'चा टीझर रिलीज

The Sabarmati Report: 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या टीझरमध्ये विक्रांत पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. या टीझरमध्ये विक्रांत साबरमती एक्स्प्रेसबद्दल बोलताना दिसत आहे.
The Sabarmati Report
The Sabarmati Reportesakal

The Sabarmati Report: '12वी फेल' (12th Fail) या चित्रपटामुळे अभिनेता विक्रांत मेस्सीला विशेष लोकप्रियता मिळाली. आता विक्रांतच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशताच आता विक्रांतच्या 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये विक्रांत पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. टीझरमध्ये विक्रांत साबरमती एक्स्प्रेसबद्दल बोलताना दिसत आहे.

'द साबरमती रिपोर्ट' चा टीझर रिलीज

'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला विक्रांत हा 27 फेब्रुवारी 2002 मध्ये घडलेल्या घटनेची बातमी सांगताना दिसत आहे. ही बातमी वाचताना विक्रांत म्हणतो, 'सर, साबरमती एक्स्प्रेस का जलना दुर्घटना नहीं थी' विक्रांतच्या या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पाहा टीझर:

The Sabarmati Report
The Sabarmati Report: विक्रांत मेस्सीचा नवीन सिनेमा! '12th फेल'नंतर दिसणार या ज्वलंत सिनेमात

कधी रिलीज होणार चित्रपट?

राशि खन्ना आणि रिद्धी डोगरा यांनी 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटामध्ये विक्रांत मॅसीसोबत काम केले आहे. रंजन चंदेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शोभा कपूर, एकता आर कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट 3 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

विक्रांतचा '12वी फेल'ला मिळाली प्रेक्षकांची पसंती

विक्रांतच्या '12वी फेल' या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विक्रांतनं आयपीएस मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील विक्रांतच्या कामाचे खूप कौतुक झाले. आता विक्रांतच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com