Munjya Movie Twitter Review sakal
Premier

Munjya Movie Twitter Review: हॉरर आणि कॉमेडीची रोलरकोस्टर राइड; जबरदस्त कथा अन् अंगावर शहारे आणणारे सीन्स, थरारक 'मुंज्या' जिंकतोय प्रेक्षकांची मनं

Sharvari Wagh Munjya Movie: भारतीय हॉरर चित्रपटातील मुंज्या हे पहिले CGI (Computer Generated Imaginary) पात्र आहे.

priyanka kulkarni

Munjya Movie Twitter Review: बॉलिवूड चित्रपटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होताना बघायला मिळत आहेत. अशातच आता मुंज्या (Munjya) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतीय हॉरर चित्रपटातील मुंज्या हे पहिले CGI (Computer Generated Imaginary) पात्र आहे. मुंज्या हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. मध्यरात्री देखील या चित्रपटाचे काही शो झाले. हे शो हाऊसफुल ठरले आहेत. अशातच मुंज्या हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंज्या या चित्रपटात शरवरी वाघ, मोना सिंह आणि अभय वर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात हॉरर आणि कॉमेडीचा तडका प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे.

नेटकऱ्यांनी शेअर केला रिव्ह्यू

अनेक नेटकऱ्यांनी मुंज्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "मुंज्या या चित्रपटाची आपण खूप वाट बघत होतो. हा चांगला हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. कलाकार, कथा, व्हीएफएक्स हे सर्व चांगले आहे. हा चित्रपट चुकवू नका."

"आता मुंज्या चित्रपटाचा मिडनाइट शो बघत आहे. शो 100% हाऊसफुल आहे. ओपनिंग सीन मस्त आहे.", असंही एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं.

एका ट्विटर (X) युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, "माझी या चित्रपटाकडून शून्य अपेक्षा होती, मी चित्रपटाचा ट्रेलरही पाहिला नव्हता. पण चित्रपट पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झालो. चित्रपट चांगला आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT