Nilam Kothari & Sameer Soni Sakal
Premier

Divorce News: नीलम-समीर वैवाहिक जीवनात खूश!

Actress Neelam Kothari and actor Sameer Soni are rumoured to be divorcing: 'सर्व काही उत्तम आहे, मी स्वप्नातदेखील नीलमबद्दल असा विचार करु शकत नाही'; समीर सोनी.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood: बॉलीवूडमध्ये घटस्फोट आता सामान्य गोष्ट बनली आहे. सध्या अभिनेत्री नीलम कोठारी आणि अभिनेता समीर सोनी यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

समीर आणि नीलम यांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. समीर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनंतर दोघांच्या नात्यात दुरावा असल्याचे मानले जात आहे. त्यानंतर समीर याने ‘आमच्या वैवाहिक आयुष्यात कोणतीच अडचण नाही,’ असे स्पष्ट केले आहे. समीर याने इन्स्टाग्रामवर नातेसंबंध आणि कुटुंबाबाबत पोस्ट केली होती.

त्यावर त्याने आजकालची जोडपी आणि लग्नाच्या पद्धतीवर निशाणा साधला होता. ‘जर श्रीमंत नवरा हवा असेल तर तुम्हाला सुंदर आणि आकर्षक असणे गरजेचे आहे. तुम्हाला सुंदर पत्नी हवी असेल तर तुम्हाला पैसे कमवावे लागतील. जर तुम्हाला आनंदी आयुष्य हवे असेल तर सहा महिने एकत्र राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घ्यायला हवा...’, अशी पोस्ट त्याने केली होती.

यावरुन सुरु झालेल्या चर्चांवर त्याने आता स्पष्‍टीकरण दिले आहे की, ‘14 वर्षांपासून मी आणि नीलम वैवाहिक जीवनात खूश आहोत. आमच्यात काहीही वाईट घडलेले नाही. सर्व काही उत्तम आहे. मी स्वप्नातदेखील नीलमबद्दल असा विचार करु शकत नाही. आपल्या निराशेसाठी माफी मागतो. मी जे बोललो ते फक्त एक निरीक्षण आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT