Bigg Boss Marathi 5 esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 :"तू त्याच्याबरोबर भोवऱ्यासारखी फिरतेस" ; अभिजीतमुळे झाला निक्की-अरबाजमध्ये राडा

Nikki - Arbaz fight in Bigg Boss Marathi season 5 : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये निक्की आणि अरबाजमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन 5 चा हा आठवडा खूप गाजतोय. पहिल्याच दिवशी निक्की आणि घनश्याममध्ये जोरदार भांडण झालेलं पाहायला मिळालं. आणि आता बिग बॉस मराठी च्या घरात आणखी एक राडा झालाय. अभिजीतमुळे निक्की आणि अरबाज मध्ये जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला.

निक्कीचं सतत अभिजीतशी जाऊन बोलणं अरबाजला खटकत असल्याचं गेल्या काही आठवड्यांपासून पाहायला मिळतंय. याबद्दल ते दोघं उघड उघड बोलले ही आहेत तर अभिजीतने याविषयीचा त्याचा रागही व्यक्त केला होता. पण आता अरबाज त्यावरून निक्कीवरच भडकलेला पाहायला मिळाला. त्यांचं त्यावर जोरदार भांडण झालं.

कलर्स मराठी वर शेअर केलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की, निक्की अभिजीतला जाऊन रागात विचारते ,"मी मनापासून माफी मागत नाही का?" त्यावर अभिजीत शांतपणे तिला तिरकस उत्तर देतो की, "हो तू कायम मनापासूनच माफी मागतेस." तिथून ती बाहेर येत असतानाच अरबाज तिच्यावर भडकतो. "फिर तू भवऱ्यासारखी फिर" असं तो तिच्यावर ओरडतो आणि नंतर "तुला एक तर माझी किंवा अभिजीत ची निवड करावी लागेल" असं सांगतो. यावर निक्की चिडते. त्यावर अरबाज म्हणतो की, "तू त्याच्याशी स्माईल करून बोलतेस. तू त्याच्या सोबतच राहत जा." यावर निक्की सगळं टेबलवरचा सामान उध्वस्त करते आणि भडकलेला अरबाज तिला इथून जायला चिडून सांगतो.

अभिजीत मुळे निकी आणि अरबाजच ग्रुप तुटणार का ? आता बिग बॉसच्या घरात आणखी काय नवीन ट्विस्ट येणार? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन पाच दररोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठी वर आणि जिओ सिनेमावर कधीही.

Abhijeet

Big

Marathi

तांबोळी Boss Bigg

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT