Bigg Boss Marathi 5 Esakal
Premier

Bigg Boss Marathi 5: "निक्कुताई तू होपलेस आहेस" , घनश्याम आणि निक्कीमध्ये रक्षाबंधन दिवशीच झालं भांडण

Nikki and Ghanshyam Darwade fight in Bigg Boss Marathi 5 : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये निक्की आणि घनश्याममध्ये जोरदार भांडण झालं.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 काही ना काही कारणामुळे चर्चेत आहे. घरातील भांडणं, दुष्मनी, स्पर्धेची चढाओढ यामुळे सगळेचजण चर्चेत असतात. त्यातच आता रक्षाबंधनच्या दिवशी घनश्याम आणि त्याची बिग बॉसमधील बहीण निक्कीमध्ये फूट पडलीये.

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो पाहायला मिळाला. या प्रोमोमध्ये निक्की आणि घनश्यामचं जोरदार भांडण पाहायला मिळालं. सोशल मीडियावर हा प्रोमो चर्चेत आहे.

या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, निकी घनश्यामला फेक म्हणाली. त्यावर घनश्यामने तिला उलटा प्रश्न केला "की काय फेक केलं ते सांग ना." घनश्याम निकी जवळ येतो आणि तिला "तू बहीण म्हणून होपलेस आहेस" असं म्हणतो. त्यावर निक्की भडकली आणि म्हणाली की, "झुठ्या बहीण-भावाच्या नात्याचा धब्बा आहेस तू." यावर चिडलेला घनश्याम म्हणाला की, "निक्कुताई म्हंटलं तिनेच घात केला."

पण घनश्याम आणि निक्की तांबोळी यांच्यात भांडण नेमकं कोणी लावलं? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. याचे उत्तरही नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळालं. धनंजयने निक्की जवळ घनश्यामची चुगली केली. "घनश्याम तुम्ही जे काही गोष्टी बोलता ते काही पॉईंट्स येऊन आम्हालाही सांगतो" असं म्हणाला. "या व्यतिरिक्त तो योगितालाही त्याची बहीण म्हणत होता आणि ती जर या घरातून गेली तर त्याला खूप दुःख होईल." असं म्हणाला आणि त्यावर योगिता खूप चिडली होती असं सांगितलं. हे ऐकून निकीला धक्काच बसला.

आता धनंजयच्या चुगली मुळेच निक्की आणि घनश्यांमध्ये भांडण झालंय का हे हे पाहणं इंटरेस्टिंग असेल तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन 5 दररोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठी वर आणि जिओ सिनेमा वर कधीही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT