Mahira Khan SAKAL
Premier

VIDEO: पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत भर कार्यक्रमात गैरवर्तन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "दहा हजारपेक्षा जास्त लोकांचा जमाव..."

Mahira Khan: माहिराचे कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये स्टेजरवर वस्तू फेकल्यानं माहिरा ही नाराज झालेली दिसत आहे.

priyanka kulkarni

Mahira Khan Share Video: पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) ही सध्या चर्चेत आहे. माहिरानं क्वेटा येथील पाकिस्तान (Pakistan) लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रेक्षकांपैकी एका व्यक्तीनं तिच्यासोबत गैरवर्तन केलं. त्या व्यक्तीनं माहिरावर वस्तू फेकल्या. अशातच आता माहिराचे कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये स्टेजरवर वस्तू फेकल्यानं माहिरा नाराज झालेली दिसत आहे. अशातच याबाबत आता माहिरानं एक पोस्ट शेअर केली आहे.

माहिरानं शेअर केला व्हिडीओ

माहिरानं सोशल मीडियावर कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कार्यक्रमाला आलेल्या लोकांची गर्दी दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करुन माहिरानं कार्यक्रमात तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल सांगितलं आहे. व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, "कार्यक्रमात जे घडले ते अनाकलनीय होते. रंगमंचावर काहीतरी फेकणे योग्य आहे, असे कोणालाही वाटू नये. जरी तुम्ही कागदामध्ये गुंडाळलेले फूल फेकले तरी ते चूकचं आहे. तुम्ही चुकीचा आदर्श देत आहात. ते अस्वीकार्य आहे. काही वेळा मला भीती वाटते, फक्त स्वत:साठीच नाही, तर इतरांसाठी जे एखाद्या अशा परिस्थितीत अडकतात."

"आम्ही कार्यक्रमातून परत येत असताना असताना कोणीतरी म्हणाले, 'यानंतर आमचा येथे कार्यक्रम होणार नाही'. मी या गोष्टीसोबत पूर्णपणे असहमत होते. हा उपाय नाही. येथे 10,000 किंवा त्याहून अधिक लोकांचा जमाव होता. हे लोक त्यांचे प्रेम आणि उत्साह दाखवत होते. मला समजले की त्यांना उत्साह कसा व्यक्त करायचा,हे त्यांना माहीत नव्हते. जो कार्यक्रमातील बदमाश होता, तो 10,000 पैकी 1 होता.", असंही माहिरानं कॅप्शनमध्ये लिहिलं.

माहिरानं पुढे कॅप्शनमध्ये लिहिलं, "कदाचित मी उठून निघून जायला हवे होते, कदाचित गर्दीतील लोकांची तपासणी केली असती, कदाचित मला त्या स्पॉटवर बसले नसते, अशा अनेक कदाचित गोष्टी असल्या असत्या. मला प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे - आम्हाला पाकिस्तानातील आणखी शहरांमध्ये यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज आहे. ज्यामुळे तुम्ही जास्त जागरूक आणि शिक्षित व्हाल. ज्यामुळे माणसे, शहरे, आपली संस्कृती, आपली एकमेकांबद्दलची समज (ज्याचा अभाव आहे), एकता ( जास्त अभाव आहे).. हे सर्व भरभराटीला येईल! मी खूप चांगल्या लोकांना भेटले. आम्ही किस्से शेअर केले, हसलो आणि माझ्या पुढच्या भेटीचा प्लॅन केला. मी कार्यक्रमातून समृद्ध होऊन परत आले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik Death Cause: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; 'या' गंभीर आजाराने होते ग्रस्त, नेमकं काय घडलं?

Amit Shah Record: अमित शहांनी नोंदवला सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावर राहण्याचा विक्रम!

Latest Maharashtra News Updates Live : वांगणी रेल्वे फाटक रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यामुळे वाहन चालवणंही कठीण

Video : पाठीमागून गपचूप आला मिठी मारली अन् छातीवर...; रस्त्यावर महिलेसोबत अश्लील कृत्य, धक्कादायक घटनेचे फुटेज व्हायरल, पाहा व्हिडीओ

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे पूर, मलब्याने घरे उद्ध्वस्त! अनेक लोक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू...

SCROLL FOR NEXT