Pooja Sawant ESAKAL
Premier

Entertainment News: लग्नानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली 'ही' मराठमोळी अभिनेत्री; शेअर केले नवऱ्यासोबतच्या पिकनिकचे खास फोटो

पूजा आता ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाली असून ती तिच्या नवऱ्यासोबत सध्या क्वालिटी टाईम स्पेंड करतेय.

priyanka kulkarni

Pooja Sawant: सध्या सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कपल म्हणजे पूजा सावंत (Pooja Sawant) आणि सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chauhan). मराठी इंडस्ट्रीची ही कलरफुल गर्ल नुकतीच लग्नबंधनात अडकली. पूजा आता ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाली असून ती तिच्या नवऱ्यासोबत सध्या क्वालिटी टाईम स्पेंड करतेय. वेळ मिळताच पूजा आणि सिद्धेशने ऑस्ट्रेलियातील निसर्गरम्य ठिकाणांना भेट दिली.

नुकतंच त्या दोघांनी एका डोंगरावर आऊटिंग केलं. सोशल मीडियावरील त्यांच्या या आऊटिंगचे फोटोज चांगलेच चर्चेत आहेत. डोंगरावर त्यांनी घेतलेला सेल्फी, धबधब्याजवळचा पूजाचा फोटो, तेथील निसर्गाचे काही सुंदर फोटोज यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यासोबतच पूजाने शेअर केलेला तिचा व्हिडिओसुद्धा सगळ्यांना आवडला.

पहा व्हिडीओ:

ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये पूजा सुंदर दिसतेय. अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत तिचं कौतुक केलं. यासोबतच तिचा नवरा सिद्धेशने सुद्धा तिचा एक व्हिडीओ शेअर केलाय ज्याला चाहत्यांची खूप पसंती मिळतेय.

२६ फेब्रुवारी २०२४ ला पूजा आणि सिद्धेश लग्नबंधनात अडकले. पूजाचं अरेंज मॅरेज असून नातेवाईकांच्या मध्यस्थीने त्यांची ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री झाली. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पूजाने तिच्या रिलेशनबाबत कमालीची गुप्तता बाळगली होती. इंडस्ट्रीत फार कमी जणांना पूजाचं लग्न ठरल्याची खबर होती.

तिच्या लग्नाला इंडस्ट्रीतील तिच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली. त्यांनी तिच्या लग्नात केलेली धमाल सोशल मीडियावर अजूनही चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT