KALKI 2898 ad box office  sakal
Premier

Kalki 2898 AD Box Office: अरारारा खतरनाक! 'कल्की'ची पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, मोडला KGF २ चा रेकॉर्ड

Kalki 2898 AD Box Office Collection Day 1: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याच्या 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे.

Payal Naik

Kalki 2898 AD Worldwide BO Collection: दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याचा 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट २७ जून रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या चित्रपटाने सगळ्यांना थक्क करणारी कामगिरी केली आहे. या चित्रपटाची वाट पाहत होते. ती उत्सुकता आता कमाईच्या आकड्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येतेय. या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कल्की २८९८ एडी'ने अनेक चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड तोडले आहेत. जर हा चित्रपट असाच कमाई करत राहिला तर या वीकेंड पर्यंत चित्रपटाचं बजेट एवढी कमाई नक्कीच होईल.

वाचा चित्रपटाचं कलेक्शन

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'कल्की 2898 AD' ने पहिल्याच दिवशी जगभरात १८० कोटींचा गल्ला जमवला आहे. ही संख्या अजून थोडी वाढू शकते. भारतातील कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर 'कल्की 2898 एडी'ने ९५ कोटी रुपये कमावले आहेत. ज्यामध्ये ६५. ४ कोटी तेलुगू भाषेत, ४ कोटी तामिळमध्ये, २४ कोटी हिंदीमध्ये, ०. ३कोटी कन्नडमध्ये आणि २. २ कोटी मल्याळममध्ये आहेत. मात्र या चित्रपटाला RRR चा पहिल्या दिवशीचा कमाईचा विक्रम मोडता आला नाही

प्रभासच्या कल्कीने पहिल्याच दिवशी जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. याने यशच्या 'केजिएफ २' चा मात्र रेकॉर्ड मोडला आहे. RRR आणि 'बाहुबली २' अजूनही पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान राखून आहेत. 'केजिएफ २' ने पहिल्या दिवशी १६४ कोटी रुपयांची कमाई केली होती. ज्याला कल्कीने मागे टाकलं आहे. RRR ने २२३ कोटी आणि बाहुबली २ ने २१४ कोटी कमावले होते.

कल्की 2898 एडी बद्दल बोलायचे तर यात अनेक कलाकारांनी कॅमिओ केले आहेत. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन लीड रोलमध्ये दिसले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक; कधी अन् कुठे? जाणून घ्या

PMC Election 2025 : PMC निवडणुकीचा सस्पेन्स कायम! आरक्षणाची सोडत कधी? आयोगाने नियमावली दिली, पण तारीख गुलदस्त्यातच

Dr Ajay Chandanwale : डॉ. अजय चंदनवाले यांची एमयुएचएसच्या कुलगुरूपदी नियुक्ती

Unseasonal Rain : शेतकरी संकटात..! अंबडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा आणि वेचणीसाठी मजूर मिळेना, दुहेरी पेच

Global Sperm Count Decline : जगभरात पुरुषांचा स्पर्म काऊंट होतोय कमी, भारतात आहे 'ही' स्थिती, संशोधनात काय आले समोर?

SCROLL FOR NEXT