kalki 2898 ad sakal
Premier

Kalki 2898 Box Office: नुसता धुरळा! तिसऱ्या दिवशी प्रभासच्या 'कल्की'ची पहिल्या दिवसापेक्षाही जास्त कमाई, वाचा एकूण कलेक्शन

Kalki 2898 AD Box Office Collection: प्रभासचा 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित झाला होता. वाचा चित्रपटाचं एकूण कलेक्शन

Payal Naik

६०० कोटींच्या मेगाबजेट मध्ये बनलेला चित्रपट 'कल्की २८९८ एडी' ने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या चित्रपटाला नेटकऱ्यांची पसंती मिळते आहे. हा चित्रपट हिंदी, तामिल, तेलुगू, कन्नड़ व मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. नाग अश्विन यांचा 'कल्की' आता बॉक्स ऑफिसवर कमाल करताना दिसतोय. प्रभास, दीपिका पादुकोण, कमल हासन और दिशा पाटनी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाची छप्परफ़ाड कमाई झाली होती. आता तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाने कमाल केली आहे.

तिसऱ्या दिवशीची कमाई

'कल्की २८९८ एडी'या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ऍडव्हान्स बुकींच्या जोरावर ५० कोटींहून अधिकची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग कमी झाला मात्र तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने सगळ्या भाषांमध्ये मिळून ९५ कोटींची कमाई केली होती. तर हिंदी भाषेत ही कमाई २२ कोटींची होती. दुसऱ्या दिवशी हा आकडा कमी होऊन ५७ कोटींवर आला होता. मात्र तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने ६७ कोटींची कमाई केली आहे. त्यातील २७ कोटी ही हिंदी भाषेतील कमाई आहे.

याचाच अर्थ बॉलिवूडचे प्रेक्षक या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी हिंदी भाषेत जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण २२० कोटीची कमाई केली आहे. त्यातील सर्वाधिक कमाई तेलगू भाषेत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

विद्यापीठाने काही घडलंच नाही हे सांगायला लावलं, अत्याचार प्रकरणावरून विद्यार्थीनींचे प्रशासनावर गंभीर आरोप

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT