Radhika Ambani Esakal
Premier

Anant & Radhika Wedding : ग्रँड संगीतानंतर अंबानींच्या घरी पार पडली ग्रह शांती पूजा ; राधिकापेक्षा 'या' व्यक्तीची होतेय चर्चा !

Anant & Radhika Pre Wedding Rituals : अनंत अंबानी आणि राधिका अंबानीच्या ग्रँड संगीतानंतर अंबानी कुटूंबाच्या घरी ग्रहशांती पूजा पार पडली. यावेळी राधिका नाही तर दुसऱ्याच व्यक्तीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सकाळ डिजिटल टीम

Anant Ambani & Radhika Merchant : मुकेश अंबानी यांच्या धाकट्या लेकाचा अनंतचा लग्नसोहळा संपूर्ण देशात गाजतोय. १२ जुलैला अनंतचं लग्न आहे पण लग्नापुर्वीच्या कार्यक्रमांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा संगीतसोहळा थाटात पार पडला आणि त्या ग्रँड संगीत सोहळ्याला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. आता अंबानींच्या घरातील ग्रहशांती पूजा पार पडली यावेळी राधिका ऐवजी दुसऱ्याच मुलीने लक्ष वेधून घेतलं.

अंबानींच्या कार्यक्रमातील ती मुलगी कोण ?

नुकतंच राधिका आणि अनंतच्या लग्नाच्या पूर्वी अंबानी कुटूंबाच्या घरी ग्रहशांती पूजा पार पडली. यावेळी संपूर्ण अंबानी आणि मर्चंट कुटूंब उपस्थित होतं. यावेळी राधिकाने पांढऱ्या रंगाची गुजराती पद्धतीने साडी नेसली होती. कपाळावर बिंदी आणि नाकात नथ असा लूक तिने केला होता. पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते राधिकाची बहीण अंजलीने. राधिकाची धाकटी बहीण अंजलीने या कार्यक्रमाला गुजराती पद्धतीची पटोला साडी नेसली होती आणि गोल्डन रंगाचा स्लिव्हलेस ब्लाउज घातला होता. ती या लूकमध्ये खूप सुंदर होती आणि अनेकांना तिचा हा लूक सगळ्यांना आवडला. बऱ्याच जणांनी तिचं कौतुक केलं.

सोशल मीडियावर अंबानी आणि मर्चंट कुटूंबांचा एकत्र फॅमिली फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये मुकेश आणि त्यांची पत्नी नीता , त्यांची तिन्ही मुलं नातवंडं आणि सुना, कोकिलाबेन अंबानी, नीता अंबानी यांची आई, राधिकाचे आई-वडील या फोटोमध्ये दिसत आहेत.

१२ जुलै २०२४ ला मुंबईच्या बीकेसीमधील जिओ कॉनव्होकेशन सेंटरमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला देशपरदेशातून अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्व उपस्थित राहणार आहेत. तर लग्नसोहळ्यानंतरही अजून काही दिवस हा लग्नाचे कार्यक्रम पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT