Mr & Mrs Mahi esskal
Premier

Mr & Mrs Mahi: जान्हवी आणि राजकुमारची जोडी 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'मिस्टर अँड मिसेस माही'ची रिलीज डेट जाहीर

Mr & Mrs Mahi: 'मिस्टर अँड मिसेस माही' ( Mr & Mrs Mahi) या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

priyanka kulkarni

Mr & Mrs Mahi: बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता करण जोहरने सोशल मीडियावर त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली. त्याचा हा आगामी सिनेमा क्रिकेटवर आधारित असून सिनेमाच्या हटके नावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 'मिस्टर अँड मिसेस माही' ( Mr & Mrs Mahi) असं या आगामी सिनेमाचं नाव असून सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

ब्लु रंगाच्या इंडियन क्रिकेट टीमच्या जर्सीवर मिस्टर अँड मिसेस माही असं लिहिलं असून 'कोणतंही स्वप्नं एकट्याने पूर्ण करता येत नाही' असं कॅप्शन या पोस्टरवर दिलं आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा सिनेमा नोव्हेंबर मध्ये रिलीज होणार होता पण आता 31 मे 2024 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. करणने हे पोस्टर शेअर करताना त्याच्या भावनासुद्धा शेअर केल्या. तो म्हणतो,"काही चित्रपट फक्त कथांपेक्षा जास्त असतात … ते कृत्रिम प्रेमापेक्षा बरंच काही असतात … ते प्रेक्षकांशी स्वप्नांबद्दल बोलतात आणि किती वेळा आपल्या जवळचे लोक आपल्या स्वप्नांच्या मार्गात येऊ शकतात … MR आणि MRS माही अपवादात्मकपणे जवळ आहेत आमची ह्रदयं.. आणि आम्ही सोमवारी आमच्या सिनेमाविषयीचे आगामी अपडेट्स शेअर करू… पण आत्ता आमच्याकडे रिलीजची तारीख आहे!!! 31 मे 2024!!! तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!!!"

मिस्टर अँड मिसेस माही या सिनेमाचं दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केलं आहे. या आधी त्यांनी 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या आधी राजकुमार आणि जान्हवी यांनी 'रुही' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. 'मिस्टर अँड मिसेस माही' या नावामुळे हा सिनेमा इंडियन क्रिएट टीमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि त्याची बायको साक्षी यांच्याशीही संबंध जोडला जातोय. तर सिनेमाच्या नावावरून सिनेमाचं कथानक क्रिकेट आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारी एक जोडी यांच्यावर आधारित आहे असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT