Salman Khan And Ram Gopal Varma Esakal
Premier

Salman Khan: लॉरेन्स बिश्नोईला उलट धमकी देण्याचा सलमानला कुणी दिला सल्ला? बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ

Salman Khan-Lawrance Bishnoi: दरम्यान माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. यावर आता राम गोपाल वर्मा यांनी आपले X वर पोस्ट शेअर करत आपले मत व्यक्त केले आहे.

आशुतोष मसगौंडे

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई प्रकरणावरील आपल्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी सलमानला बिश्नोईला उलट धमकी देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. यावर आता राम गोपाल वर्मा यांनी आपले X वर पोस्ट शेअर करत आपले मत व्यक्त केले आहे.

आपल्या स्पष्ट विधानांसाठी ओळखले जाणारे राम गोपाल वर्मा म्हणाले की, सलमान खान या कठीण परिस्थितीत बिश्नोईकडून असलेल्या वाढत्या धोक्याला उत्तर देईल अशी आशा आहे. त्यांच्या पोस्टमध्ये वर्मा यांनी लिहिले की, "सलमान खानने 'बी' ला सुपर काउंटर धमकी द्यावी, नाहीतर टायगर स्टार भ्याड असल्यासारखे दिसेल. एसकेने त्याच्या चाहत्यांसाठी हे केले पाहिजे आणि तो 'बी' पेक्षा मोठा आहे. तो एक सुपरहिरो आहे."

दरम्यान राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये 'बी' असा उल्लेख लॉरेन्स बिश्नोईसाठी केल्याचे त्यांच्या पोस्टमधील वाक्यांमधून दिसते.

सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर राम गोपाल वर्मा यांचे हे वक्तव्य आले आहे. लॉरेन्स बिश्नोई हा एक गुंड आहे आणि 1998 च्या काळवीट शिकार घटनेबद्दल सलमानविरुद्ध 25 वर्षांचा सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये, राम गोपाल वर्मा यांनी संपूर्ण परिस्थिती किती विचित्र वाटली यावर उपहासात्मक टिप्पणी केली. नाव न घेता, त्यांनी या घटनांचे वर्णन 'खराब चित्रपटाची पटकथा' असे केले आहे. त्याने लिहिले, "एक वकील, गुंड बनला, सुपरस्टारला मारून हरणाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे... ही आतापर्यंतची सर्वात अविश्वसनीय आणि हास्यास्पद पटकथा वाटते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT