ram gopal varma  sakal
Premier

राम गोपाल वर्माच्या मृत वडिलांच्या आत्म्याशी बोललेले श्यामक डावर; दिग्दर्शकाने स्वतः सांगितला किस्सा, म्हणाले-

Ram Gopal Verma Untold Story: लोकप्रिय दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक प्रसंग सांगून सगळ्यांनाच चकीत केलं आहे.

Payal Naik

चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हॉरर चित्रपट दिले. मात्र खऱ्या आयुष्यात त्यांचा या सगळ्या गोष्टींवर मुळीच विश्वास नाही. ते नास्तिक आहेत. मात्र त्यांच्यासोबत अशी एक घटना घडली ज्यामुळे त्यांना काही अंशी या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागला. लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक श्यामक डावर यांनी त्यांच्या मृत वडिलांच्या आत्म्यासोबत संवाद साधला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा प्रसंग सांगितला आहे.

वडिलांचं १५ दिवसांपूर्वी निधन

मुलाखतीत राम गोपाल वर्मा म्हणाले, 'मी कोरिओग्राफर श्यामक डावर याला यापूर्वी कधीही भेटलो नव्हतो. एकदा फक्त अमिताभ बच्चन यांच्या घरी आमची भेट झालेली. एकदा एका फ्लाइटमध्ये श्यामक माझ्या मागे कुठेतरी बसला होता. माझ्या वडिलांचं १५ दिवसांपूर्वी निधन झालं होतं. मी जाऊन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलो. आम्ही गप्पा मारू लागलो. विमान जसं टेक ऑफ करत होतं श्यामकने अचानक मला विचारलं, तुमच्या वडिलांचं निधन झालंय का? हा एक सर्वसाधारण प्रश्न होता पण खरा होता.'

ते पुढे म्हणाले, 'माझ्या वडिलांचं १५ दिवसांपूर्वीचं निधन झालं होतं. मी म्हणालो, हो. तो खिडकीच्या बाजू;या बसलेला आणि मी पॅसेजच्या बाजूला. त्याने काही वेळ माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, 'ते आपल्यासोबत इथे आहेत. हे ऐकून मी पूर्णपणे चकीत झालो. तो एक कोरिओग्राफर आहे. मी असे प्रश्न अशा एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित करतो जो काहीतरी अतरंगी काम करत असेल. पण यांच्याबाबतीत तेही नव्हतं. मी त्याला म्हणालो, माझा यावर विश्वास नाही. त्यानंतर तो म्हणाला की तुमचे वडीलदेखील हेच म्हणाले की त्यांनीही कधी अशा गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. आणि आता त्यांना तुमच्या भविष्याची काळजी वाटतेय.'

राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले, 'मला काही कळतंच नव्हतं. माझ्या मनात हेच होतं की त्याला कसं माहिती पडलं की माझ्या वडिलांचं निधन झालंय? मला राग येत होता, आश्चर्य वाटत होतं, भीती वाटत होती. मी खूप बेचैन झालो आणि तिथून उठून पुन्हा माझ्या सीटवर निघून गेलो. तिथेही मी हाच विचार करत होतो की त्याला कसं कळलं?'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG ODI: इंग्लंड वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? विराट कोहली तंदुरुस्त, पण हार्दिक अजूनही दुखापतीनं त्रस्त

MP Naresh Mhaske : नवी मुंबईत तर 'नाईक जनता पार्टी' चालते; खासदार नरेश म्हस्के यांची टीका

डिझाइन, शाश्वतता आणि प्रवासी अनुभव... नवी मुंबई विमानतळाचा मोठा सन्मान! ‘जगातील सर्वात सुंदर विमानतळ’ यादीत समावेश

Latest Marathi News Live Update : कन्नडमध्ये धारदार शस्त्राने एकाचा खून

Mumbai News: सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शास्त्राने वार करत...; शिवसेना आमदारावर हल्ल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT