Ravi Kishan  Esakal
Premier

Bigg Boss Ott Season 3 : अपमानजनक भाषेवरून रवी किशन यांचे शिवानीला खडेबोल ; शिवानी हमसून हमसून रडली

Shivani Kumar cried on Weekend Ka War : अभिनेते, खासदार रवी किशन यांनी शिवानी कुमारला तिच्या अपमानजनक भाषेवरून खडेबोल सुनावले.

सकाळ डिजिटल टीम

Ravi Kishan & Shivani Kumar : बिग बॉस ओटीटी सीजन ३ पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. स्पर्धकांची भांडण आणि विजेतेपदासाठी चढाओढ यामुळे हा शो चर्चेत आहे. पण या शोमधील स्पर्धक शिवानी कुमार कायमच तिच्या भाषेमुळे वादग्रस्त ठरलीय. सगळ्यांचा अपमान करणाऱ्या शिवानी रवी किशन यांनी खडेबोल सुनावले.

बिग बॉस ओटीटी सीजन ३च्या काल पार पडलेल्या वीकेंड का वारमध्ये खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली. याचा प्रोमोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. यावेळी अनिल यांनी शिवानीला "तू जी घरात भाषा वापरतेस त्याने तुझ्या गावातील संस्कृतीला, गावाला नैतिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर एका उंचीवर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेस असं तुला वाटतं का?" असा प्रश्न विचारला. यावर शिवानीने होकार दिला. तेव्हाच रवी किशन यांनी शोमध्ये एंट्री घेतली. त्यांनी म्हंटलं कि,"कोणाचाही अपमान करण्यासाठी भाषेचा ढाल म्हणून वापर करण्यात येऊ शकत नाही. तुम्ही भाषेच्या नावाखाली कुणाचा अपमान किंवा छेडछाड करू शकत नाही." असं म्हंटलं. हे बोलणं ऐकून शिवानी रडायला लागली आणि तिने आईची शपथ घेत म्हंटलं कि, "ती घरीही अशीच भाषा वापरते." त्यावर रवी किशन यांनी "भाषा ही जोडण्याचं काम करते तोडण्याचं नाही" असं उत्तर दिल.

शिवानीनंतर अनिल यांनी वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षितच्या वागण्यावरही टीका केली. ती घरात काहीही घडलं तरीही स्वतः पीडित असल्याचं ढोंग करते असं त्यांनी म्हंटल. यावेळी घरातून चंद्रिका एलिमिनेट झाली.

रवी किशन यांच्याकडून खडेबोल ऐकल्यानंतर शिवानी आता तरी तिचं घरातील वागणं सुधारेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिग बॉस ओटीटी सीजन ३मध्ये कोणता स्पर्धक विजयी होणार हे जाणून घेण्यासही प्रेक्षक उत्सुक आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस ओटीटी सीजन ३ फक्त जिओ सिनेमावर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंचा दावा तथ्यहीन, कुणबी प्रमाणपत्र रद्दबाबत प्रशासनाचं स्पष्टीकरण; बावनकुळेंकडे सोपवला अहवाल

Shaktipeeth Highway Update : शक्तिपीठ महामार्ग आता थेट रेडी बंदर अन् मुंबई-गोवा हायवेला जोडणार! MSRDC चे पुन्हा सर्व्हेचे आदेश, आमदार केसरकरांनी दिली मोठी अपडेट

Marathi News Live Updates : JPSC-JSSC परीक्षार्थींचे रांचीमध्ये आंदोलन; विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो विधानसभेच्या घेराव मोर्चात सहभागी

Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? तुकाराम मुंढेंनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव; किस्सा ऐकून सगळेच हसले

MS Dhoni Pension : सहा वर्षांपूर्वी निवृत्ती, IPL मध्ये अजूनही खेळतोय महेंद्रसिंग धोनी! भारताच्या माजी कर्णधाराला पेन्शन किती?

SCROLL FOR NEXT