Rinku Rajguru esakal
Premier

Rinku Rajguru: फिल्मफेअर रेड कार्पेटवर रिंकूची स्टायलिश अंदाजात हजेरी; आरचीचा ग्लॅमरस लूकवर चाहते झाले फिदा

Rinku Rajguru: नुकतीच रिंकूने फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यासाठी रिंकूनं ग्लॅमरस लूक केला होता.

priyanka kulkarni

Rinku Rajguru: सगळ्यांची लाडकी आरची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूची (Rinku Rajguru) क्रेझ अजूनही कायम आहे. सैराट सिनेमानंतर रिंकूमध्ये बरंच ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळालं. तिचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन असो किंवा लूकमध्ये तिने केलेले बदल असो सोशल मीडियावर तिची चर्चा खूप पाहायला मिळाली आणि आता रिंकूने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नुकतीच रिंकूने फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली आणि तिच्या ग्लॅमरस लूकवर तिचे चाहते फिदा झाले.

रिंकूच्या ग्लॅमरस लूकनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

राजश्री मराठीने नुकताच रिंकूचा फिल्मफेअर रेड कार्पेटचा लूक शेअर केला. रिंकूने मल्टीकलर डीप नेक गाऊन यावेळी घातला होता. पहिल्यांदाच तिने ग्लॅमरस लूकमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली. या आधी रिंकूने बऱ्याचदा पंजाबी सूट किंवा साडी नेसून रेड कार्पेटवर हजेरी लावलीये. पण रिंकूच्या या ग्लॅमरस लूकने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिचा हा लूक सगळ्यांनाच पसंत पडला.

नेटकऱ्यांनी रिंकूचं केलं कौतुक

अनेकांनी तिच्या या लूकवर कमेंट करत तिचं कौतुक केलं. तिच्या या लूकवर एका चाहत्याने ‘’सावली सुंदरता’ अशी कमेंट केली आहे. तर एकाने तिला हा लूक शोभून दिसतोय असं म्हंटलं आहे. अनेकांनी हार्ट आणि गुलाबाच्या फुलांचे ईमोजी शेअर करत तिच्या या ग्लॅमरस लूकचं कौतुक केलं.

Rinku Rajguru

दरम्यान रिंकूचा २०२३ मध्ये झिम्मा २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमात तिने साकारलेली तानिया ही भूमिका सगळयांना आवडली. तर तिची आणि निर्मिती सावंत यांची जोडीही सगळ्यांनी एन्जॉय केली. यानंतर रिंकूचे आणखी तीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. रिंकू खिलार या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिनेमात ती अभिनेता ललित प्रभाकरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मकरंद माने या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत तर रिंकू पिंगा या हिंदी सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत ती या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांनो सावधान! आठव्या वेतन आयोगाच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम; सरकारकडून आवाहन

Mumbai Viral Video: मुंबईत 2BHK फ्लॅटचं भाडं किती, इन्फ्लुएंसर तरुणीने सांगितला थक्क करणारा आकडा

Pune Crime : आरोपींची भूमिका गौण असल्याचा दावा दिशाभूल करणारा, शरद मोहोळ खून प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद; चार आरोपींचा जामिनासाठी अर्ज

खरे मूर्ख तर आम्ही... अंकिता वालावलकरने सांगितली सुरजची स्ट्रॅटेजी; त्याने स्वतःला मुद्दाम गरीब दाखवलं...

Maharashtra SSC Exam 2026: दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; विद्यार्थ्यांनो, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

SCROLL FOR NEXT