Sai Tamhankar  esakal
Premier

Sai Tamhankar: आता येणार दुनियादारी 2 ! अभिनेत्री सई ताम्हणकरने केली घोषणा

Sai Tamhankar: दिग्दर्शक संजय जाधव दुनियादारीच्या सिक्वेलची घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.

priyanka kulkarni

Sai Tamhankar: दुनियादारी हा मराठी इंडस्ट्रीतील सगळ्यात जास्त गाजलेल्या सिनेमांपैकी एक. स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), अंकुश चौधरी (Ankush Choudhary), सई ताम्हणकर (Sai Tamhankar), उर्मिला कानिटकर (Urmilla Kothare), जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांच्या मुख्य भूमिका असलेला या सिनेमाने एक माहोल काही काळ मराठी सिनेविश्वात तयार केला. कॉलेज लाईफ, कट्ट्यावरची धमाल, मैत्री या सगळ्यांवर भाष्य करणारा सिनेमा आजही अनेकजण आवर्जून पाहतात. या सिनेमातील गाणीही आजही तितकीच मराठी प्रेक्षकांची लाडकी आहेत. आजही प्रेक्षकांच्या लाडक्या असलेल्या या सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतीच मॅशेबल इंडियाच्या द बॉम्बे जर्नी या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिला शोचा होस्ट सिद्धार्थने तुम्ही सगळ्यांनी दुनियादारी सिनेमाच्या कास्टच्या रियुनियनचा विचार केला आहे का? असा प्रश्न विचारला त्यावेळी तिने सिनेमाच्या सिक्वेलवर काम करत असल्याची गोष्ट रिव्हील केली. ती म्हणाली,"खरंतर आम्ही दुनियादारी सिनेमाच्या सिक्वेलवर काम करतोय. मी ही गोष्ट आधी कोणत्याही मुलाखतीमध्ये रिव्हील केली नाहीये. मी पहिल्यांदा या शोमध्ये बोलतेय. मी सिनेमाची स्क्रिप्ट वाचली आहे. ती खरंच खूप चांगली स्क्रिप्ट आहे. अजून आम्ही याविषयी घोषणा केली नाहीये आणि मला आशा आहे कि आम्ही हा सिनेमा बनवू. आता आम्ही फक्त सुरुवातीच्या टप्प्यावर काम करतोय. "

तिला दुनियादारी नंतर तुला पुन्हा तसेच रोल ऑफर झाले का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सईने नकार दिला. ती म्हणाली,"नाही. दुनियादारी नंतर मला तसेच रोल परत ऑफर झाले नाहीत. त्या ऐवजी मला एक अतिशय वेगळा रोल पिकनिक नावाच्या सिनेमासाठी ऑफर करण्यात आला होता. पण हंटर या सिनेमानंतर मला ज्योत्स्ना या भूमिकेसारखे अनेक रोल्स ऑफर झाले पण मी ते नाकारले." असं ती यावेळी म्हणाली.

सईच्या या खुलास्याने दुनियादारीच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी कमेंट्समध्ये त्यांचा आनंद व्यक्त केला. या सिनेमात कोणते कलाकार असणार? सिनेमाचं कथानक काय असेल? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागेल. दुनियादारी या सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव दुनियादारीच्या सिक्वेलची घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.

दरम्यान सई लवकरच वेगवेगळ्या वेब सिरीज आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. अग्नी ही तिची आगामी वेबसिरीज असून यातून ती एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यासोबतच ती अभिनेता जितेंद्र जोशीसोबत आणखी एका वेबसिरीजमध्ये काम करतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT