sai tamhankar sakal
Premier

Sai Tamhankar Birthday: वर्षातून फक्त सहा महिनेच आईसोबत एका घरात राहते सई ताम्हणकर; 'हे'आहे कारण

Sai Tamhankar Age: अभिनेत्री सई ताम्हणकर हिने एका मुलाखतीत आईपासून वेगळं राहण्याचं कारण सांगितलं होतं.

Payal Naik

Sai Tamhankar Mother: मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असणारी सई आज हिंदी सिनेसृष्टीवरही राज करतेय. आज २५ जून रोजी सईचा वाढदिवस आहे. तिने 'हंटर', 'भक्षक', 'मीमी' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी सई लवकरच नागराज मंजुळे यांच्या 'मटका किंग या हिंदी सीरिजमध्ये झळकणार आहे. सई आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मात्र सई तिच्या आईसोबत राहत नाही. त्या दोघी वर्षातून केवळ सहा महिने किंवा त्यापेक्षाही कमी वेळ एकत्र राहतात. त्यामागचं कारण अभिनेत्रीने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं.

सईने नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांना चकीत केलं. मात्र तिचा इथवरचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. तिच्या आजवरच्या प्रवासात तिची आई कायम तिच्या सोबत होती. सईने मुंबईत आलिशान घर घेतलं मात्र सई तिच्या आईसोबत राहत नाही. सई मूळची सांगलीची. मात्र तिने कामासाठी फार १९ व्या वर्षी घर सोडलं. तर मुंबईत ती तब्बल १० ठिकाणी राहिली. त्यामुळेच तिने तिच्या घराला द इलेव्हन्थ प्लेस असं नाव दिलं आहे. सई वर्षातून केवळ सहा महिने किंवा त्यापेक्षाही कमी आई जवळ राहते. त्याबद्दल बोलताना सई म्हणालेली, 'आमचं एकमेकींवर खूप प्रेम आहे. पण आम्ही एकमेकांसोबत नाही राहत.'

सई पुढे म्हणाली, 'मी आम्हा दोघींनाही तलवारीची उपमा देईन. जशा एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. तसं आम्ही दोघी एका घरात एकत्र नाही राहू शकत. आम्ही वर्षातून सहा महिने एकत्र असतो आणि सहा महिने वेगवेगळं राहतो. पण या तलवारींनी लढलेल्या लढाया आणि त्यांचा प्रवास हा माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे. अनेक लढाया जिंकून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत.' सईच्या पुढील प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT