salman khan  sakal
Premier

Salman Khan: सलमान खानने साजरा केला कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरचा वाढदिवस, दोघांचा कोझी फोटो व्हायरल, चर्चेला उधाण

Salman khan iulia vantur photo: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने त्याची कथित गर्लफ्रेंड युलियाचा वाढदिवस साजरा केला आहे.

Payal Naik

Salman khan Iulia Vantur Relation: बॉलिवूड अभिनेता सलमान खान अजूनही अविवाहित आहे. मात्र त्याच्या करिअरमध्ये त्याचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. सलमान त्याच्या चाहत्यांच्या मनावर कायम राज्य करत आला आहे. तो चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतो. चाहते त्यांच्या लाडक्या भाईजानच्या लग्नाची अजूनही वाट पाहत आहेत. मात्र आता सलमान एका वेगळ्याच कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. सलमानने नुकताच त्याच्या कथित गर्लफ्रेंडचा वाढदिवस त्याच्या घरी साजरा केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला एकच उधाण आलं आहे.

सलमानने आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर हीचा वाढदिवस त्यांच्या घरी साजरा केला आहे. सलमानचा मेहुणा अतुल अग्निहोत्रीनेही त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अर्पिता खान, आयुष शर्मा, अलविरा अग्निहोत्री आणि अरहान खान दिसत आहेत. फोटोंपैकी एका फोटोमध्ये, ज्युलियादिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे आणि तिची मान सलमानच्या खांद्यावर झुकलेली दिसत आहे. ती या क्षणाचा आनंद घेताना दिसतेय.

त्यांच्या या फोटोमुळे चाहते भलतेच आनंदी झाले आहेत. युलिया आणि सलमान यांना एकत्र पाहून चाहते खुश झाले आहेत. ज्युलिया यापूर्वी सलमानसोबतच्या नात्याबद्दल बोलली आहे. त्याच्याशी जोडले जाण्याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत असं ती म्हणाली होती.

गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाने देखील युलिया वंतूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. त्यानेही या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तो मित्र मिका सिंग, पलक मुच्छाल, पलाश मुछाल, शेखर रावजियानी, सोनाक्षी सिन्हाचा पती झहीर इक्बाल आणि आयुष शर्मासोबत दिसत आहे. पार्टीतील एका क्लिपमध्ये सलमान खान हिमेशला किस करताना दिसत आहे. सोशल मीडियावर चाहते आता त्यांच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करता आहेत.

सलमानच्या कामाबद्दल बोलायचं तर तो यापूर्वी 'राधे' या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर तो 'टायगर ३' मध्ये दिसला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात तो कतरिना कैफसोबत दिसला होता. तर दोन महिन्यापूर्वी त्याच्या बांद्रा येथील घरावर हल्ला झाला होता. नुकताच त्याने त्याबद्दलचा जबाब नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत घर नाही सांगून बंगला न सोडणाऱ्या मुंडेंचा चौपाटीवर आलिशान फ्लॅट, खरेदी केल्यापासून बंदच, कोट्यवधी रुपये किंमत

Panchang 13 August 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे

Solapur News:'५० हजार बहिणी पाठविणार देवाभाऊंना राख्या'; स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी महिला जोडण्याचा भाजपचा प्रयत्न

Latest Maharashtra News Updates :मनोज जरांगे-पाटील 15 ऑगस्टला नांदेड दौऱ्यावर; जिल्ह्यात ठिकठिकाणी चावडी बैठका सुरू

Zilla Parishad : गट, गण प्रारूप रचनेवर सुनावणी पूर्ण; विभागीय आयुक्तांकडून ११५ सूचना व हरकती मान्य; ८८ फेटाळल्या

SCROLL FOR NEXT