Salman Khan sakal
Premier

Salman Khan: बिश्नोई गँगच्या नावानं सलमानला जीवे मारण्याची धमकी; 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक

Salman Khan Death threat case: एका तरुणानं युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करुन सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

priyanka kulkarni

Salman Khan Death threat case: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानल (Salman Khan) 25 वर्षीय तरुणानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बनवारीलाल लातुरलाल गुजर असं या तरुणाचं नाव असून त्यानं एका युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करुन सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून (Rajasthan) या तरुणाला अटक केली आहे.

युट्यूबवर व्हिडीओ शेअर करुन दिली धमकी

मुंबई सायबर पोलिसांनी बनवारीलाल लातुरलाल गुजर या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यानं अरे छोड़ो यार नावाच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यानं बिश्नोई गँगचा आणि सलमान खानला जीवे मारण्याच्या प्लॅनचा उल्लेख केला.

मुंबई गुन्हे शाखेने आरोपी बनवारीलाल लातुरलाल गुजर याला राजस्थानच्या बोर्डा गावातून अटक केली. पुढील तपासासाठी त्याला मुंबईत घेऊन जाणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेने ANI ला दिली आहे.

14 एप्रिलच्या पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी सलमान खानच्या वांद्रे भागातील निवासस्थानाबाहेर अनेक गोळीबार केला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी सलमानची सुरक्षा वाढवली होती. याप्रकरणी एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी एक अनुज थापनचा मृत्यू झाला आहे. त्याने लॉकअपमध्ये गळफास लावून आत्महत्या केली, असं सांगण्यात आलं.

सलमान खान हा लवकरच सिकंदर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ए.आर. मुरुगदोस दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवाला प्रस्तुत सिकंदर हा चित्रपट 2025 च्या ईदला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT