salman khan firing esakal
Premier

Salman Khan house firing : सलमान खानला मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा! जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबारप्रकरणी अनुज थापनला पोलिसांनी अटक केली होती.

सकाळ वृत्तसेवा


मुंबई, ता. १० : अभिनेता सलमान खान याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अनुज थापनच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात सलमानचा कुठलाही संबंध दिसून येत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने याचिकेतील प्रतिवादी म्हणून असलेले सलमानचे नाव वगळण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले.

सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबारप्रकरणी अनुज थापनला पोलिसांनी अटक केली होती. त्याने पोलिस कोठडीत असतानाच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथून त्याला रुग्णालयात हलवले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनुजला कोठडीत पोलिसांनी मारहाण केली, असा आरोप करीत त्याची आई रिटा देवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अनुजच्या कोठडीतील मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली असून या याचिकेवर सोमवारी (ता. १०) न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी खंडपीठाने रिटा देवी यांना याचिकेतील सलमान खानचे नाव वगळण्याचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT