Naga Chaitanya samantha esakal
Premier

'या' व्यक्तीमुळे सामंथा- नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला; मंत्र्याचा मोठा दावा, सोशल मीडियावर रंगली एकच चर्चा

Samantha- Naga Chaitanya Divorce Reason: मंत्री कोंडा सुरेखा यांनी नागा चैतन्य आणि सामंथा यांचा घटस्फोट एका मंत्र्यामुळे झाला असल्याचं म्हटलं आहे.

Payal Naik

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांची जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडती होती. मात्र २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेत असल्याचं सांगत चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्या घटस्फोटाची वेगवेगळी कारणं सांगण्यात येत होती. मात्र आता त्यांच्या घटस्फोट प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्ट समोर येतोय. त्यांच्या घटस्फोटावरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटासाठी बीआरएस नेते केटी रामाराव (KTR) जबाबदार असल्याचं वक्तव्य मंत्री सुरेखा यांनी केलं आहे. मात्र यावर सामंथा आणि नाग चैतन्य या दोघांनीही संताप व्यक्त केला आहे.

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांचा ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट झाला. दोघांचे लग्न चार वर्षेही टिकू शकलं नाही. कोंडा यांनी हा घटस्फोट नेते केटी रामाराव यांच्यामुळे झाला असल्याचं म्हटलं. त्यावर सामंथाने एक पोस्ट करत त्यांना सुनावलं आहे. सामंथाने लिहिलं, 'एक स्त्री असणे आणि बाहेर पडणे आणि काम करणे आणि एका ग्लॅमरस उद्योगात टिकून राहणे, जिथे महिलांना बहुतेक प्रॉप्ससारखे वागवले जाते. प्रेमात पडणे, ठेच लागणे आणि उठणे आणि पुन्हा लढणे, त्यासाठी खूप हिंमत लागते. कोंडा सुरेखा गरु... मला माझ्या प्रवासाचा अभिमान आहे. कृपया माझ्या प्रवासावर चिखलफेक करू नका. मला आशा आहे की, मंत्री या नात्याने तुमचे बोलणे खूप महत्त्वाचे आहे, याची तुम्हाला कल्पना असेल. मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही लोकांच्या गोपनीयतेबद्दल जबाबदार राहून आदर बाळगावा.'

यासोबतच नागा चैतन्य यानेही एक पोस्ट केली आहे. त्याने पोस्ट करत लिहिलं, ''घटस्फोटाचा निर्णय हा जीवनातील सर्वात वेदनादायक आणि दुर्दैवी निर्णयांपैकी एक आहे. खूप विचार केल्यानंतर, मी आणि माझ्या पूर्वीश्रमीच्या पत्नीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. माझ्या पूर्वीश्रमीच्या पत्नीविषयी तसेच माझ्या कुटुंबाविषयीच्या आदरापोटी मी आतापर्यंत या सर्व गोष्टींबाबत मौन बाळगलं. मंत्री कोंडा सुरेखा गरु यांनी केलेला दावा खोटाच नाही तर निव्वळ हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. महिलांना पाठिंबा आणि सन्मान मिळायला हवा. प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चर्चेत येण्यासाठी सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांचा गैरफायदा घेणे आणि शोषण करणे, हे लज्जास्पद आहे.' त्या दोघांनीही यावर आपलं मत मांडत हा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून चिडला: अम्पायरसोबत वाद

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT