Shubhankar Ekbote And Amruta Bane esakal
Premier

Shubhankar Ekbote And Amruta Bane: शुभंकर - अमृता अडकले लग्नबंधनात; पुणेरी थाट आणि मॅचिंग आऊटफिटने वेधलं लक्ष

Shubhankar Ekbote And Amruta Bane: पुण्यात पार पडलेल्या शुभंकर - अमृता यांच्या शाही विवाहसोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

priyanka kulkarni

Shubhankar Ekbote And Amruta Bane: अभिनेता शुभंकर एकबोटे (Shubhankar Ekbote) आणि अभिनेत्री अमृता बने (Amruta Bane) आज म्हणजे 21 एप्रिल 2024 ला लग्नबंधनात अडकले. पुण्यात पार पडलेल्या या शाही विवाहसोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बऱ्याच काळापासून त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्यांच्या लग्नापुर्वीच्या सगळ्याच समारंभाची चर्चा रंगली. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडीओज चांगलेच गाजले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नसमारंभाची फोटोज आणि व्हिडीओज चांगलेच व्हायरल झाले आहे.

अल्ट्रा मराठी बझने त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे व्हिडीओज इन्स्ट्राग्रामवर शेअर केले आहेत. अमृताने लग्नात गुलाबी रंगाची साडी नेसली आहे तर शुभंकरने तिच्या साडीला मॅचिंग व्हाईट कुर्ता आणि जांभळ्या रंगाचा दुपट्टा, पुणेरी पगडी असा पोशाख त्याने केला होता. तर अमृताच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. गुलाबी रंगाची नऊवारी, तिला मॅचिंग जांभळ्या रंगाचा डिझायनर ब्लाउज, केसांचा सुंदर खोपा आणि मराठमोळे दागिने तिने लग्नात घातले होते. त्यांचे लग्नाचे फोटोज सगळ्यांनाच पसंत पडले.

त्यांच्या मेहंदी, संगीत आणि हळदी समारंभाने सोशल मीडियावर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. संगीतला अमृताने जांभळ्या रंगाचा लेहेंगा तर शुभंकरने सिल्व्हर रंगाचा टीशर्ट त्यावर ग्रे रंगाचा ब्लेझर आणि पॅन्ट असा लूक त्याने केला होता. त्यांचा रोमँटिक डान्स सगळ्यांना पसंत पडला.

‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवर अमृता आणि शुभंकरची ओळख झाली. तर मालिकेतही त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केलं होती. त्यांनी साकारलेली वृंदा आणि राणा ही भूमिका खूप गाजली. या मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. पुढे जाऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा असून अश्विनी यांनीही अनेक मालिकांमध्ये काम करत स्वतःची ओळख बनवली होती. आईच्या पावलावर पाऊल ठेवत शुभंकरनेही मराठी सिनेइंडस्ट्रीत स्वतःची ओळख बनवलीय. लवकरच तो ‘छावा’ या विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमात काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT