seema chandekar esakal
Premier

या वयात का लग्न केलं विचारणाऱ्यांना सिद्धार्थ चांदेकरच्या आईनेच दिलं उत्तर; म्हणाल्या- तीन वर्षांपूर्वी माझा अपघात...

Siddharth Chandekar Mother Talked About Her Second Marriage: लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या आईचं दुसरं लग्न लावून दिलं त्यावरून त्याचं कौतुक करण्यात आलं होतं.

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकणाऱ्या सिद्धार्थने चाहत्यांच्या मनात घर केलं. सिद्धार्थने त्याचा एका मोठ्या निर्णयाने प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवली होती तो निर्णय म्हणजे आईचं लग्न. सिद्धार्थने आईच्या वयाच्या ५७ व्या वर्षी तिचं लग्न लावून दिलं. गेल्या वर्षी सीमा चांदेकर यांचं मोठ्या थाटामाटात लग्न लागलं. काही जणांनी त्यांना या वयात का लग्न करताय असा प्रश्न विचारला. यावर सिद्धार्थने त्याची बाजू मांडली होती. आता एका मुलाखतीत सीमा यांनीही त्यांचं म्हणणं स्पष्टपणे सांगितलं आहे.

अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलता त्या म्हणाल्या, 'पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घ्यायला देखील मला खूप वर्ष लागली. मुलं सेटल झाली, आता त्यांचं सगळं झालंय म्हणून मी हा निर्णय घेतला असंही नाही. कारण ते दोघेही माझ्याबरोबर होतेच. त्यामुळे मला एकटं वाटायचं असं काहीच कारण नव्हतं. पण, ३ वर्षांपूर्वी माझा एक अपघात झाला होता. त्यावेळी माझ्या उजव्या हातात प्लेट होती. त्यामुळे मी कुठेही जाऊ शकत नव्हते. सिद्धार्थ सुमेधादेखील मला येऊन भेटत होते. आमचं व्हिडिओ कॉलवर बोलणं होत होतं'.

त्या पुढे म्हणाल्या, 'या वयात बाकीच्या कुठल्या गरजांसाठी म्हणून आपण लग्न करत नाही. या वयात लग्न करण्याची काय आवश्यकता आहे, असंही म्हटलं जातं. माझ्यासारख्याच प्रत्येक बाईने हा विचार करावा असंही माझं म्हणणं नाही. प्रत्येकीचा विचार वेगळा असेल. अपघाताच्या वेळी मला कुठेतरी एकटं वाटू लागलं होतं. म्हणजे मला असं सांगायचंय की माझी बाई आलेली नाही. आणि मला त्रास झालाय तर मी हे सिद्धार्थला फोनवर सांगू नाही शकत. किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील. म्हणजे आज आम्ही मैत्रिणी भेटलो, खूप मजा आली. तर हे सगळं मी प्रत्येकवेळेस मुलांना सांगू शकत नाही. मुलं ऐकतात, पण, त्यांच्याकडे तेवढा वेळही पाहिजे ना. हे मला कुठेतरी हळूहळू जाणवायला लागलं होतं. त्यामुळे आपल्यासोबत कुणीतरी हवं ही गरज वाटू लागली. हा प्रवास सोपा नव्हता पण मी निर्णय घेतला.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TRAI TV Ad Limit: चॅनेल्सना मोठा झटका! टीव्हीवर आता तासाला फक्त 12 मिनिटंच जाहिराती दिसणार; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

घरकाम करणारीच्या पगारावरून वाद! अभिनेत्रीच्या वक्तव्यावर नेटकरी संतापले; म्हणाले- मुंबईत आहेस तर...

MLC Election: महाविकास आघाडीत जागावाटप फाइनल! MVA मध्ये ‘डावपेच ’; काँग्रेस आणि ठाकरे गटाला जास्त जागा

Breaking: रिषभ पंतने LSG चे कर्णधारपद सोडले; हार्दिक पांड्या त्याची जागा घेणार?

Video : कमळी मालिकेत मोठा ट्विस्ट ! होणार शिक्षणमंत्र्यांनी एंट्री; प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले..

SCROLL FOR NEXT