Breaking: रिषभ पंतने LSG चे कर्णधारपद सोडले; हार्दिक पांड्या त्याची जागा घेणार?

Rishabh Pant Quits LSG Captaincy: रिषभ पंत याने Lucknow Super Giants संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आयपीएल विश्वात नव्या चर्चांना उधाण आले आहे. आयपीएल २०२६ मधील निराशाजनक कामगिरीनंतर पंतने स्वतःहून नेतृत्वाची जबाबदारी सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, जी फ्रँचायझीने तात्काळ स्वीकारली.
Rishabh Pant Steps Down As LSG Captain  

Rishabh Pant Steps Down As LSG Captain  

esakal 

Updated on

Why Rishabh Pant stepped down from LSG captaincy: लखनौ सुपर जायंट्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होतेच. अशात शुक्रवारी कर्णधार रिषभने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. फ्रँचायझीने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, रिषभने कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची विनंती केली होती, जी तात्काळ स्वीकारण्यात आली आहे. त्याचवेळी आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) त्याची जागा घेऊ शकतो का, अशी चर्चा सुरू झाली आहे. हार्दिकही फ्रँचायझी सोडणार असल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com