Siddharth Jadhav Post Esakal
Premier

Siddharth Jadhav : मुसळधार पावसात काम करणाऱ्या मुंबई पोलिसांचे सिद्धूने मानले आभार ; कृतीचं होतंय सोशल मीडियावर कौतुक !

Siddharth Jadhav shared his gratitude towards Mumbai Police : अभिनेता सिद्धार्थ जाधवने मुंबईच्या मुसळधार पावसात अहोरात्र उभं राहून काम करणाऱ्या मुंबई पोलिसांचे आभार मानले.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Rains : मुंबईला गेल्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाने झोडपलं. त्यामुळे संपूर्ण मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबलं असून ट्राफिक, संथ वाहतूक याचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणा, पोलीस दल अहोरात्र काम करत आहेत. मुंबई पोलीस ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी पोलीस मुसळधार पावसात अहोरात्र उभे आहेत. याच कौतुक अभिनेता सिद्धार्थ जाधवने केलं.

सिद्धार्थची पोस्ट

सोशल मीडियावर सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सिद्धार्थने रस्त्यावर उभं राहून ट्रॅफिक सांभाळणाऱ्या मुंबई वाहतूक पोलीस, मुंबई पोलिसांची भेट घेत सिद्धार्थने त्यांचे आभार मानले. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोलिसांबरोबरच सेल्फी शेअर करत त्यांचे आभार मानले. सिद्धार्थच्या या कृतीच सगळीकडे कौतुक होतंय.

राजश्री मराठी या चॅनलने त्यांच्या युट्युब चॅनेलवर सोशल मीडियावर सिद्धार्थचा पोलिसांशी संवाद साधतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत सिद्धार्थच्या या कृतीचं कौतुक केलं.

सिद्धार्थ हा कायमच त्याच्या सामाजिक बांधिलकीमुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियावरही याबाबत व्यक्त होतो. यामुळे सिद्धार्थच्या चांगुलपणाचं सोशल मीडियावर कौतुक होतं असतं. त्याचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

सिद्धार्थ लवकरच 'नवरा माझा नवसाचा २' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तर सिद्धार्थची लवकरच मटका किंग ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नागराज मंजुळे यांनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं आहे तर विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका वर्मा, गुलशन ग्रोव्हर यांच्या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका आहेत. लवकरच ही वेबसिरीज अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina Death Sentence Demand : ''शेख हसीना यांना मृत्युदंड द्या'' ; बांगलदेशच्या 'ICT' मुख्य अभियोक्त्यांची मागणी!

Gautami Patil Latest Update : अखेर गौतमी पाटीलने ‘त्या’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची घेतली भेट अन् अपघात प्रकरणावर पडला पडदा!

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

SCROLL FOR NEXT