sonakshi sinha answer to trollers  sakal
Premier

Sonakshi Sinha: लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना वैतागली सोनाक्षी सिन्हा; काहीही न बोलता केली फक्त एकच गोष्ट

Sonakshi Sinha On Trollers: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने ट्रोलर्ससाठी एक निर्णय घेतला आहे.

Payal Naik

बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने २३ जून २०२४ रोजी झहीर इकबाल याच्याशी लग्नगाठ बांधली. तिने तिच्या नव्या घरात रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. या लग्नासाठी दोन्ही घरातील कुटुंबीय उपस्थित होते. त्यांचे लग्नानंतरचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यांनी लग्नानंतर ग्रँड रिसेप्शन देत मित्रपरिवाराला आमंत्रित केलं होतं. या रिसेप्शनला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. मात्र सोनाक्षीच्या आयुष्यातील या महत्वाच्या दिवशीही अनेक नेटकरी तिला ट्रोल करताना दिसून आले. त्यासाठी सोनाक्षीने एक गोष्ट केली आहे.

ट्रोलर्सना चाप

सोनाक्षी आणि झहीर नुकतेच लग्नबंधनात अडकले. त्यांनी त्यांच्या लग्नाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. चाहत्यांनीही या चित्रपटावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र त्यातही काही नेटकरी सोनाक्षीला वेगवेगळ्या गोष्टींवरून सुनावताना दिसले. दुसऱ्या धर्मात लग्नापासून ते तिच्या कपड्यांपर्यंत अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सगळ्यांना वैतागून सोनाक्षी आणि झहीरने त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टच्या खालील कमेंट सेक्शनच बंद करून टाकलं आहे. तिने कमेंट सेक्शन ऑफ केलं आहे ज्यामुळे ट्रोलर्सना चाप बसला आहे.

झहीर इकबालसोबत लग्नाचे फोटो पोस्ट करताना सोनाक्षीने २३ जूनलाच लग्न करण्यामागचं कारण सांगितलं. २०१७ मध्ये या दिवशी त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. आता ते एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. या फोटोंमध्ये शत्रुघ्न सिन्हाही दिसत आहेत. यापूर्वी ते आपल्या मुलीच्या लग्नामुळे आनंदी नाहीत असं सांगण्यात येत होतं. मात्र आता त्यांनीही सगळ्यांची बोलती बंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

काटोल नगराध्यक्षांचे पद धोक्यात; अर्चना देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

SCROLL FOR NEXT