Sonakshi Sinha Sonakshi Sinha
Premier

Sonakshi Sinha: खाईन तर फक्त आईच्याच हातचं;सोनाक्षीची फेवरेट आहे सिंधी कढी

सोनाक्षीने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आवडत्या डिशबद्दल खुलासा केला

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लग्नामुळं चर्चेत आहे. अभिनेत्री सोनाक्षी 23 जून 2024 रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाच्या सुंदर क्षणांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान, तिच्या लग्नासंदर्भात आणि तिच्या खासगी आयुष्यासंदर्भात अनेक किस्से समोर येत आहेत. यातीलच एक किस्सा म्हणजे तिची आवडती डिश.

काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हा वेब सिरीज 'हिरामंडीमुळं' चर्चेत आली होती. सोनाक्षीने 2010 मध्ये चित्रपट 'दबंग' मधून पदार्पण करत इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला. त्यानंतर सोनाक्षीने अनेक चित्रपट केले. आपल्या अभिनयाच्या जोरावर सोनाक्षीने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. सेलेब्रेटींच्या प्रत्येक चाहत्याला त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची एक वेगळीच उस्तुकता असते. तर आम्ही आज तुम्हाला सोनाक्षीच्या आवडत्या डिश बद्दल सांगणार आहोत.

सोनाक्षीने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आवडत्या डिशबद्दल खुलासा केला होता. तिला सिंधी कढी खुप आवडते. पण केवळ तिच्या आईच्याच हातची. हे सांगताना ती म्हणाली, मी खुप ठिकाणी सिंधी कढीची चव चाखली आहे. पण आईच्या हाताची चव कोणत्याच कढीला आली नाही. आईच्या हातची सिंधी कढी वर्ल्ड बेस्ट आहे. अशी भावना तिनं यावेळी व्यक्त केली होती.

सोनाक्षीला सिंधी कढीसोबत स्ट्रीट फूडचेही वेड आहे. पिझ्झा, वडा पाव यांसारखे सर्व प्रकारचे स्ट्रीट फूड आवडतात. सोनाक्षी सिन्हाने सांगितले की, जेव्हा ती कॉलेजमध्ये होती, तेव्हा ती रोज भात खात असे आणि आजही तिला जितका भात दिला जातो तितका भात ती खाऊ शकते, सोनाक्षीला भाताचे खूप वेड आहे.

सोनाक्षी सिन्हाने 7 वर्षे डेट केल्यानंतर बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केले. दोघांनी 23 जून 2017 ला प्रेमाची कबुली दिली होती. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांनी हिंदू आणि मुस्लीम रितीरिवाजाऐवजी रजिस्टर मॅरेजचा निर्णय़ घेतला होता. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये वधू आणि वर पांढऱ्या पोशाखात पाहायला मिळाले. सोनाक्षीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाचे सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT