Sonakshi Sinha Love marriage was written in birth Horoscope 
Premier

सोनाक्षीची जन्मकुंडली तंतोतंत ठरली खरी , कुंडली प्रमाणेच घडत गेल्या गोष्टी

सोनाक्षी सिन्हाने 7 वर्षे डेट केल्यानंतर बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केले.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतचं तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकली. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान, 23 जून 2024 रोजी मित्र परिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचा नोंदणीकृत विवाह झाला.

सोनाक्षी सिन्हाने 7 वर्षे डेट केल्यानंतर बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केले. अशातच सोनाक्षीची जन्म कुंडली समोर आली आहे. अनेकांचा जन्म कुंडली राशी यावर विश्वास नसतो पण सोनाक्षीच्या कुंडलीत लिहल्याप्रमाणेच तिच्या आयुष्यात गोष्टी घडत गेल्या आहेत.

तर नेमकं काय लिहिलं आहे जन्म कुंडलीत?

मिळालेल्या माहितीनुसार सोनाक्षीची रास मिथुन आहे. तिच्या जन्मकुंडलीत प्रेम विवाह लिहीला आहे. पण ती आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी वेळ घेणार.

ज्योतिषने सांगितल्यानुसार, तिचं लग्न उशिरा होईल. दोघांचं नातं अतूट राहीलं. यासोबतच लग्नानंतर सोनाक्षी आपल्या जोडीदारासोबत निखळ प्रेमाच नातं आयुष्यभर जपणार असल्याचेही तिच्या राशीत लिहीलं आहे.

जन्म कुंडलीप्रमाणे सोनाक्षीचा विवाह उशीरा म्हणजेच, 37 व्या वर्षी झाला आहे. तसेच, तिनं प्रेमाची कबुलीही उशीरा दिली आहे. दोघांनी 23 जून 2017 ला प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सोनाक्षीने ज्या दिवशी प्रेमाची कबुली दिली त्याच तारखेला दोघे विवाहबंधनात अडकले.

दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांनी हिंदू आणि मुस्लीम रितीरिवाजाऐवजी रजिस्टर मॅरेजचा निर्णय़ घेतला होता. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये वधू आणि वर पांढऱ्या पोशाखात पाहायला मिळाले. सोनाक्षीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाचे सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

सात वर्षांपूर्वी (23.06.2017) या दिवशी आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिले आणि ते कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमाने आम्हाला सर्व आव्हाने आणि विजयांमध्ये मार्गदर्शन केले आहे. आम्हाला या क्षणापर्यंत नेले आहे.

जिथे आमचे कुटुंब आणि देव यांच्या आशीर्वादाने… आता आम्ही पती आणि पत्नी आहोत. आतापासून ते कायमचे एकमेकांसोबत प्रेम, आशा आणि सर्व सुंदर गोष्टी येथे आहेत. सोनाक्षी-झहीर 23-6-2024. अशा आशयाची कॅप्शनदेखील तिनं लिहित झहीरवर असलेलं प्रेम पुन्हा व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT