sonalee kulkarni sakal
Premier

VIDEO: 'पुष्पा-2' मधील गाण्यावर अप्सरेचा जबरदस्त डान्स; सोनालीच्या व्हिडीओवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

Sonalee Kulkarni: नुकताच मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली ही अंगारों या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Sonalee Kulkarni: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. 'अंगारों' आणि 'पुष्पा राज' ही पुष्पा-2 मधील दोन गाणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. अशातच या गाण्यांमधील अंगारों (Angaaron) या गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ सध्या नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नुकताच मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली ही अंगारों या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सोनालीचा व्हिडीओ व्हायरल

सोनालीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली निळ्या रंगाचा ड्रेस आणि मेकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. सोनाली व्हिडीओमध्ये पुष्पा-2 या चित्रपटातील अंगारों या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला सोनालीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "आमचा सामे" सोनालीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ:

अंगारों हे गाणं हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये रिलीज झालं. हे गाणं श्रेया घोषालनं गायलं आहे. तर या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य यांनी केली आहे. या गाण्यातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांच्या डान्सनं अनेकांची मनं जिंकली आहेत.

'पुष्पा-2' या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबतच रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: राज्यात देशभक्तीचा सूर घुमणार! सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

Aadhaar Card Update Fees : महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून आधारकार्ड अपडेटसाठी शुल्कात झाला बदल

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : सीबीआय अधिकाऱ्यांच्या १२ सदस्यांच्या पथकाने चेंगराचेंगरीच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली

SCROLL FOR NEXT