Sonu Nigam Night music live concert in pune
Sonu Nigam Night music live concert in pune esakal
Premier

Sonu Nigam Concert Pune : पुणेकरांवर होणार सोनू निगमच्या सुरेल स्वरांची बरसात! कधी अन् कुठे रंगणार संगीत मैफलीची पर्वणी जाणून घ्या

Kiran Mahanavar

लोकप्रिय गायक-संगीतकार सोनू निगम यांच्या संगीत मैफलीची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. एकापेक्षा एक बहारदार गीतांनी सजणाऱ्या ‘सोनू निगम नाईट’ या विशेष मैफिलीचे आयोजन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे करण्यात आले आहे.

ही विशेष मैफील ११ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता कोथरूड परिसरातील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे आयोजित करण्यात आली आहे. कोहिनूर ग्रुप (कृष्णकुमार गोयल एंटरप्राईज) हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून ॲबिज किचन हे फूड पार्टनर आहेत.

या कार्यक्रमाची तिकीटविक्री सुरू झाली आहे. ticketkhidakee.com या संकेतस्थळांवर ही तिकिटे उपलब्ध आहेत.

(Sonu Nigam Night music live concert in pune)

सोनू निगम यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने आणि लोकप्रिय गीतांनी संगीतसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे. त्यांनी आजवर सुमारे १० वेगवेगळ्या भाषांमधील दोन हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

तसेच, विविध संगीत प्रकार हाताळत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. ‘संदेसे आते है’, ‘ये दिल दीवाना’, ‘कल हो ना हो’, ‘आज की रात’, ‘सतरंगी रे’, ‘अभी मुझ में कहीं’ यांसारखी त्यांनी गायलेली अनेक गाणी रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यातीलच काही गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी ‘सोनू निगम नाईट’ या कार्यक्रमात मिळणार आहेत.

Where is Sonu Nigam Music concert in Pune?

या कार्यक्रमाची तिकीटविक्री सुरू झाली आहे. ticketkhidakee.com या संकेतस्थळांवर ही तिकिटे उपलब्ध आहेत. तसेच, सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून कार्यक्रमाची तिकिटे आरक्षित करता येणार आहेत.

हे लक्षात ठेवा (date time location and all details)

कार्यक्रम : ‘सोनू निगम नाईट’

कधी : ११ मे, २०२४

केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता

कुठे : सूर्यकांत काकडे फार्म्स, कोथरूड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT