Sonu Sood: सोनू सूदने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट, बहुप्रतिक्षित 'फतेह'ची रिलीज डेट केली जाहीर sakal
Premier

Sonu Sood: सोनू सूदने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट, बहुप्रतिक्षित 'फतेह'ची रिलीज डेट केली जाहीर

Sonu Sood Latest News: झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Chinmay Jagtap

Fateeh Movie: अभिनेता सोनू सूद याचा आज वाढदिवस असून त्याने या दिवसाचे औचित्य साधून चाहत्यांना खास भेट दिली आहे.आज सोनू सूद याने सोशल मीडियावर आपल्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'फतेह' रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट एक सायबर क्राइम थ्रिलर असणार आहे.

फतेहचे दिग्दर्शन स्वत: सोनू सूद करणार असून या सिनेमातून सोनू सूद दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. नवीन पोस्टर आणि काही खास BTS फोटो पोस्ट करून सोनू सूदने ही घोषणा केली आहे.फतेह 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.(Latest Bollywood Marathi News)

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना सूद याने या बद्दल ची उत्सुकता व्यक्त केली आहे.सूदने सोशल मीडियावर पोस्ट टाकताच चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला. यावेळी सुद म्हणाला की, फतेहची कथा "महत्त्वपूर्ण" आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे.

शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित, 'फतेह' मध्ये सूद नसीरुद्दीन शाह आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (Naseeruddin Shah and Jacqueline Fernandez)

सोनू सूदचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणारा ‘फतेह’ सायबर क्राइमच्या वास्तविक जीवनातील घटनां वर आधारित असून झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT