tamannah bhatia  sakal
Premier

'स्त्री २' मधील तमन्ना भाटियाचं गाणं रिलीज; पण नाही चालली अभिनेत्रीची जादू, स्टेप्स पाहून नेटकरी नाराज, म्हणतात-

Stree 2 Tamannaah Bhatia Dance: अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने 'स्त्री २' मध्ये एक आयटम नंबर केला आहे. मात्र हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं नाही.

Payal Naik

अभिनेते पंकज त्रिपाठी, राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री २'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वी २४ जुलै रोजी या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यातून अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने आपला जलवा दाखवला आहे. या चित्रपटात तमन्ना 'आज की रात' या गाण्यावर थिरकताना दिसतेय. मात्र तमन्नाचं हे गाणं फारसं कमाल दाखवू शकलेलं नाही. तिचा डान्स पाहून चाहते निराश झाले आहेत. ते आता तमन्नाची तुलना नोरा फतेही हिच्याशी करत आहेत.

पहिल्या भागात नोरा ही कमरिया या गाण्यावर ठुमके लगावताना दिसली होती. हे गाणं प्रचंड गाजलं होतं. चाहते या गाण्याचे चाहते झाले होते. कमरिया हे गाणं प्रत्येक कार्यक्रमात वाजत होतं. मात्र 'स्त्री २' मधील 'आज की रात' हे गाणं तशी कमाल दाखवू शकलेलं नाही. या गाण्याचे बोलही प्रेक्षकांना आवडलेले नाहीत. त्यावर या गाण्याचं संगीतही नेटकऱ्यांना पसंत पडलेलं नाही. त्यावर भर म्हणून तमन्नाचा डान्सही फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. तमन्ना या गाण्यात 'जेलर' चित्रपटातील 'आ लुका वालिया' या गाण्यासारखीच डान्स करताना दिसत आहे. तिने कपडेदेखील तसेच घातले आहेत. त्यामुळे नवीन काही नसल्याने चाहते निराश झाले आहेत.

याबद्दल बोलताना एका नेटकऱ्याने लिहिलं, 'स्त्री मधील कमरिया या गाण्याच्या तुलनेत हे गाणं काहीच नाहीये.' एका युझरने लिहिलं, 'सगळ्यात बेकार गाणं.' आणखी एकाने लिहिलं, 'पूर्णपणे वाईट आहे हे खराब संगीत आणि वाईब.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'सध्या कोरिओग्राफीमध्ये काय चाललंय, अशा फालतू गोष्टी बघायला मिळतायत. आणखी एकाने लिहिलं, 'नोरा फतेहीच्या कमरिया गाण्याच्या पुढे काहीच नाहीये हे.' अनेकांनी या गाण्याचं कौतुकही केलं आहे परंतु, हे गाणं प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरं ठरलं नाहीये असं दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT