Vishal Punjabi Esakal
Premier

तर करोडो रुपये कमवेन... सुपरस्टार बायकोला सापडलेला रंगेहाथ, वेडिंग फिल्ममेकरने सांगितलं व्हॅनिटी व्हॅनमध्ये काय घडलं?

Bollywood actor caught red handed while cheating : बॉलिवूडचा आघाडीचा फिल्ममेकर विशाल पंजाबीने बॉलिवूडमधील एका हाय प्रोफाइल वेडिंगबद्दल खुलासा केला.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील आलिशान विवाहसोहळे, त्यासाठी केली जाणारी फोटोग्राफी, त्याची बनवली जाणारी फिल्म कायमच सामान्य जनतेला आकर्षित करते. एखाद्या परिकथेतील गोष्टीप्रमाणे हा लग्नसोहळा चित्रित केला जातो आणि रस्ताही हे वेडिंग फिल्ममेकर लाखो रुपये फी आकारतात. बॉलिवूडमधील आघाडीचा वेडिंग फिल्ममेकर असलेल्या विशाल पंजाबीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने बॉलिवूडमधील एका सेलिब्रिटी जोडीविषयी धक्कादायक खुलासा केला.

विशाल पंजाबीने नुकतीच डीजे सिम्स या युट्युब चॅनेलवर हजेरी लावली. यावेळी त्याने बॉलिवूडमधील हाय प्रोफाइल लग्नसोहळे आणि त्यातील आव्हानं यावर भाष्य केलं. याचवेळी त्याने एका बॉलिवूड अभिनेत्याविषयी खुलासा केला. ज्याला त्याच्या बायकोने लग्नानंतर दोनच महिन्यात दुसऱ्या मुलीबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आणि त्यामुळे विशालचं कसं नुकसान झालं याचा किस्सा त्याने शेअर केला.

या मुलाखतीत त्याने सांगितलं कि,"एक दिग्गज बॉलिवूड अभिनेता त्याच्या बायकोला फसवत होता. त्याच्या बायकोने लग्नानंतर दोनच महिन्यात सेटवरील त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्याला आणि बॉलिवूड अभिनेत्रीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. त्यानंतर मी त्या नवऱ्याला फोन करत होतो तो माझा फोन उचलत नव्हता. मी त्या मुलीला फोन केला ती माझ्यावर भडकली आणि म्हणाली,माझ्याशी बोलू नकोस, मला आमच्या लग्नाची फिल्म नको आहे. त्यानंतर मी त्याच्या मॅनेजरला फोन केला तेव्हा तो म्हणाला कि, आम्हाला ही फिल्म नको आहे. मी विचारात पडलो कि या फिल्मचं मी करू काय ? मी नेटफ्लिक्सला विकू का ? मला त्या फिल्मचे फक्त ५०%चं पैसे मिळाले होते आणि उरलेले ५०% मला फिल्म दिल्यानंतर मिळणार होते पण माझं नुकसान झालं. शेवटी मी माझ्या करारामध्ये बदल केला आणि आता मी पूर्णपणे १००% रक्कम आधी घेतो. "

त्या लग्नाबद्दल बोलताना तो म्हणाला की, "मी नाव घेऊ शकत नाही. तो खूप मोठा बॉलिवूडमधील अभिनेता आहे. तो त्याच्या लग्नात रडत होता. तो बायकोला आय लव्ह यु म्हणाला पण ते फक्त मगरीचे अश्रू होते. माझ्याकडे असलेल्या त्या फुटेजची किंमत लाखो रुपये आहे आणि त्यातून मी खूप कमावू शकतो. ती एक कॉमेडी फिल्म आहे. कधी ना कधी मी ती विकेन."

सोशल मीडियावर ही मुलाखत चांगलीच चर्चेत अनेक युझर्स ही जोडी कोण असेल यावर चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. अनुष्का शर्मा -विराट कोहली, कियारा अडवाणी -सिद्धार्थ मल्होत्रा आणि दीपिका पदुकोण -रणवीर सिंह यांच्या लग्नाच्या फिल्म्स त्यानेच बनवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor Praises Modi : काँग्रेसवरील नाराजीच्या चर्चांमध्ये शशी थरूर यांनी केलं मोदींचं पुन्हा कौतुक!

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

SCROLL FOR NEXT