Rohit Sharma Biopic Esakal
Premier

Rohit Sharma : "तुम्ही रोहित शर्मासारखे दिसता " ; मराठी अभिनेत्याला चाहत्याने केली रोहितच्या बायोपिकमध्ये काम करण्याची विनंती

Rohit Sharma Biopic : क्रिकेटर रोहित शर्माच्या बायोपिकमध्ये काम करण्याची विनंती एका चाहत्याने मराठी अभिनेत्याला केली.

सकाळ डिजिटल टीम

Rohit Sharma Biopic : टी २० वर्ल्डकप जिंकल्यामुळे भारतीय क्रिकेटर आणि भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा सध्या चर्चेत आहे. सध्याचा स्टार फलंदाज असलेल्या रोहितच्या आणि संपूर्ण भारतीय संघाच्या मेहनतीमुळे यंदा टी २० विश्वचषक भारतीय क्रिकेट टीमने जिंकला आहे. त्यामुळं सध्या रोहित शर्माचे चाहते त्याचा बायोपिक रुपेरी पडद्यावर पाहायला उत्सुक आहेत आणि एका चाहत्याने तर एका मराठी अभिनेत्याने रोहितची भूमिका साकारावी अशी इच्छा व्यक्त केली. हा अभिनेता आहे सुयश टिळक.

सुयशने आजवर नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करत त्याच्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली आहे. का रे दुरावा या मालिकेमुळे सुयशला प्रसिद्धी मिळाली. तर त्याची नाटकंही खूप गाजली. तर नुकतंच सुयशने आस्क मी नाऊ या फीचरद्वारे त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला.

या सेशनमध्ये एका चाहत्याने सुयशने रोहित शर्माच्या बायोपिकमध्ये काम करावं अशी इच्छा व्यक्त केली. "जर रोहित शर्मावर बायोपिक बनवला तर तुम्ही ऑडिशन द्या... तुम्ही रोहितसारखा दिसता" अशी विनंती केली त्यावर सुयशने ओके नक्की असा रिप्लाय दिला. तर त्याने या स्टोरीमध्ये रोहित शर्मालाही टॅग केलं आहे. दरम्यान, अलिकडेच सुयश अबोली मालिकेत काम केलं होतं तर 'बापमाणूस', 'पुढचं पाऊल', 'दुर्वा', 'जाऊ नको दूर बाबा', 'सख्या रे' या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्याची सन मराठीवर 'आदिशक्ती' ही मालिका सुरु असून या मालिकेत तो पल्लवी पाटीलबरोबर स्क्रीन शेअर करतोय.

suyash tilak post

सुयशचं रंगभूमीवर 'स्ट्रॉबेरी' आणि 'मी स्वरा आणि ते दोघं' ही नाटक गाजली होती. 'मी स्वरा...' या नाटकातील अभिनयासाठी त्याचं बरंच कौतुकही झालं होतं. तर 'जीवाची होतीया काहिली' या मालिकेत त्याने साकारलेली निगेटिव्ह भूमिकाही सुपरहिट झाली होती. तर 'कॉफी आणि बरंच काही' या सिनेमात त्याने काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT