Rajinikanth
Rajinikanth esakal
Premier

Rajinikanth: डोळ्यावर गॉगल अन् हातात चार घड्याळं; Thalaivar 171 मधील सुपरस्टार रजनीकांत यांच्या जबरदस्त लूकनं वेधलं लक्ष

priyanka kulkarni

Rajinikanth: मास्टर (Master), विक्रम (Vikram) आणि लिओ (Leo) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे लोकेश कनागराज (Lokesh Kanagraj) यांच्या थलायवर 171 (Thalaivar 171) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सुपरस्टार रजनीकांत  (Rajinikanth)  स्टारर या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. थलायवर 171 या चित्रपटातील रजनीकांत यांचा जबरदस्त लूक रिलीज करण्यात आला आहे. या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

थलायवर 171 मधील रजनीकांत यांचा जबरदस्त लूक

डोळ्यावर गॉगल, हातात चार घड्याळं आणि चेहऱ्यावर अॅटिट्युड असा थलायवर 171 मधील रजनीकांत यांचा लूक रिलीज करण्यात आला आहे. थलायवर 171 या चित्रपटातील रजनीकांत यांचा लूक लोकेश कनागराज यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गेल्या वर्षी रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. तसेच त्यांचा लाल सलाम हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता प्रेक्षक त्यांच्या थलायवर 171 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

गेल्या वर्षी केली चित्रपटाची घोषणा

लोकेश कनागराज आणि रजनीकांत यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये थलायवर 171 या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाची अजून रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

चित्रपटाचं टायटल 'या' दिवशी होणार रिलीज

थलायवर 171 हे या चित्रपटाला तात्पुरतं दिलेलं नाव आहे, लोकेश कनागराज हे थलायवर 171 या चित्रपटाच्या टायटलची घोषणा 22 एप्रिल रोजी करणार आहेत. चित्रपटाची कथा लोकेश यांनी लिहिली आहे.तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील त्यांनीच केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT