Rajinikanth: 'थलायवा'चा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास; रजनीकांत यांच्यावर नेटकरी करतायत कौतुकाचा वर्षाव

Rajinikanth: नुकताच रजनीकांत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रजनीकांत हे फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसत आहेत.
Rajinikanth
Rajinikanthesakal

Rajinikanth: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) हे त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. रजनीकांत यांची चित्रपटातील स्टाईल नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. अशताच रजनीकांत यांच्या साधेपणाची देखील चर्चा होत असते. नुकताच रजनीकांत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रजनीकांत हे फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसत आहेत.

रजनीकांत यांचा व्हिडीओ व्हायरल

रजनीकांत हे आंध्र प्रदेशातील कडप्पा येथून निघालेल्या फ्लाइटमधील इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसले. फ्लाइटमध्ये रजनीकांत यांना पाहून फ्लाइटमधील लोक आश्चर्यचकित झाले. रजनीकांत यांचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामधील एका व्हिडीओमध्ये रजनीकांत हे विंडो सीटवर बसून कानात एअरपोड्स घालत आहेत, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये रजनीकांत हे विमानातील इतर प्रवाशांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. या दोन्हीही व्हिडीओला कमेंट्स करुन अनेकांनी रजनीकांत यांचे कौतुक केले आहे.

पाहा व्हिडीओ:

अभिनेता जिवानं रजनीकांत यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत प्रवास केला"

Rajinikanth
Rajinikanth Birthday: किती आले किती गेले बादशहा फक्त एकच, 'थलायवा'! नावातचं सगळं काही

सध्या रजनीकांत हे ज्ञानवेल यांच्या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. अमिताभ बच्चन, फहद फासिल, राणा दग्गुबती, मंजू वॉरियर आणि दुशारा विजयन यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत. अनिरुद्ध रविचंदर चित्रपटाला संगीत देणार आहे.

33 वर्षानंतर बिग बींसोबत शेअर करणार स्क्रिन

रजनीकांत हे थलायवर 170 या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहेत. दोघेही 33 वर्षांनंतर स्क्रिन शेअर करणार आहेत. रजनीकांत यांनी एक पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली होती. पोस्टमध्ये रजनीकांत यांनी लिहिलं, '33 वर्षांनंतर मी माझे गुरू अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहे.ज्ञानवेल यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनत आहे. चित्रपटाचे नाव आहे, थलायवर 170 ."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com