TIME 100 2024 alia bhatt sakshi malik esakal
Premier

TIME 100 2024: सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी जाहीर;अभिनेत्री आलिया भट्ट अन् कुस्तीपटू साक्षी मलिकच्या नावाचा समावेश

Most Influential People 2024: टाईम्स मासिकाच्या 2024 मधील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान मिळवणारे भारतीय आणि भारतीय वंशाचे व्यक्ती कोण आहेत? हे जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Most Influential People 2024: टाईम्स मासिकाची 2024 च्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक कलाकार, आयकॉन,खेळाडू, वैज्ञानिक, राजकारणी आणि व्यावसायिकांच्या नावांचा समावेश आहे. वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, ऑलिम्पियन कुस्तीपटू साक्षी मलिक आणि ब्रिटिश अभिनेता-दिग्दर्शक देव पटेल यांचे नाव देखील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत आहे. टाईम्स मासिकाच्या 2024 मधील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान मिळवणारे भारतीय आणि भारतीय वंशाचे व्यक्ती कोण आहेत? हे जाणून घेऊयात...

आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट ही 2024 मधील सर्वात प्रभावशाली असलेल्या 100 व्यक्तींपैकी एक ठरली आहे. ब्रिटीश नागरिकत्व असलेल्या आलियानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. आलियाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं आहे. आलिया ही भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियानं बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. तिने गेल्या वर्षी Netlfix च्या "हार्ट ऑफ स्टोन" या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

देव पटेल

अभिनेता देव पटेलनं 2008 मध्ये रिलीज झालेल्या “स्लमडॉग मिलेनियर” या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. “मंकी मॅन” या चित्रपटाद्वारे देव पटेलनं दिग्दर्शनात पदार्पण केले. आता तो 2024 मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक ठरला आहे.

साक्षी मलिक

ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनं देखील 2024 मधील र्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

सत्या नडेला

मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेला यांचा तिसऱ्यांदा टाइमच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे.सत्या नडेला यांचा जन्म हैदराबाद येथे झाला. त्यांनी कर्नाटकातील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बॅचलर पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते युनायटेड स्टेट्समध्ये गेले आणि मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष झाले.

वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या लोन प्रोग्रॅम्सचे संचालक जिगर शाह, भारतीय वंशाच्या ब्रिटीश रेस्टॉरेटर आणि कुकबुक लेखिका अस्मा खान आणि येल विद्यापीठात खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र विभागातील प्रोफेसर प्रियमवदा नटराजन यांच्या नावाचा देखील समावेश 2024 मधील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT