Salman Khan Esakal
Premier

Salman Khan : टॉम क्रूझच्या 'मिशन इम्पॉसिबल'च्या टीमबरोबर करणार सलमान खान काम

Salman Khan working with Mission Impossible team : अभिनेता सलमान खान सिकंदर सिनेमासाठी मिशन इम्पॉसिबल सिनेमाच्या टीम बरोबर काम करणार असल्याचं म्हंटलं जातंय.

सकाळ डिजिटल टीम

Salman Khan : अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे चर्चेत आहे पण घडल्या प्रकरमळे घाबरून न जाता सलमानने सिनेमात काम करणं सुरु ठेवलं आहे. लवकरच त्याचा सिकंदर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार या सिनेमासाठी खास हॉलिवूडची टीम स्टंट डिझाईन करणार आहे. काही दिवसांपूर्वीच १८ जूनपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं म्हंटलं जात होतं.

टॉम क्रुझच्या टीमची मदत घेणार सलमान

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, सध्या काही फॅन अकाऊंट्सनी असं म्हंटलं आहे कि, टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल सिनेमातील गाजलेला उडी मारण्याचा सीन चित्रित करणारे अॅक्शन दिग्दर्शक आता सिकंदर सिनेमातील सलमानचे अॅक्शन सीन्स तयार करणार आहेत. ही बातमी ऐकून जरी सलमानचे चाहते खुश झाले असले तरीही अजून सिकंदर सिनेमाच्या टीमने किंवा मिशन इम्पॉसिबल सिनेमाच्या टीम कडून याबाबत कोणतंही अपडेट शेअर करण्यात आलं नाहीये.

सिकंदर सिनेमाची चर्चा

या वर्षी रमजान ईदला सलमानने त्याच्या आगामी सिनेमाची सिकंदरची घोषणा केली. "यावर्षी बडे मियां आणि छोटे मिया , मैदान सिनेमा बघा आणि पुढील वर्षी सिकंदरला भेटा."अशी पोस्ट सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली होती. ए आर मुरुगदास हे हा सिनेमा दिग्दर्शित करणार असून साजिद नाडियादवाला या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. रश्मिका मंदाना, सुनील शेट्टी, प्रतीक पाटील बब्बर या सिनेमात काम करणार आहेत. रश्मिका पहिल्यांदाच सलमानबरोबर काम करतेय. याबरोबरच तिचा 'पुष्पा २' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

सिनेमातील कमाल स्टंट

या सिनेमाचं शूटिंग १८ जून २०२४ ला सुरु होणार असून सिनेमाच्या पहिल्या शेड्युलमध्ये एक कमाल स्टंट शूट होणार आहे. समुद्र सपाटीपासून ३३००० फूट उंचीवर विमानाचा वापर करून हा सीन शूटिंग केला जाणार आहे असं म्हंटल जातंय. या सिनेमाची आणि सिक्वेन्सची चर्चा आतापासूनच प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddhivinayak Temple : ठाकरे गटाची अडचण वाढणार? सिद्धिविनायक मंदिरातील देणगी व्यवहारांची मागील पाच वर्षांची होणार चौकशी; सीएम फडणवीसांचे आदेश

IPL 2027 Trade Update: हार्दिक पांड्याच नव्हे, तर Mumbai Indians 'या' पाच खेळाडूंना करू शकते संघाबाहेर; MI चा मास्टर प्लान

Missing Link: मिसिंग लिंक अपघाताआधी काय घडलं? किरकोळ अपघातामुळे २ मार्गिका बंद, वाहनांनी अचानक लेन बदलताच फॉर्च्युनरची ट्रकला धडक

Latest Marathi News Live Update : भाजपचे खासदार धनंजय महाडिक सहपरिवार आमदार सतेज पाटील यांच्या भेटीला

स्टार प्रवाहची आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकारांनी शेअर केल्या पोस्ट; बांदेकरांच्या सुनेशी आहे संबंध

SCROLL FOR NEXT