Premier

Bollywood Unknown Facts : 'दिलवाले दुल्हनिया...' साठी शाहरुख नाही तर हा हॉलीवूडचा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली निवड

Dilwale Dulhaniya Le Jayenge Movie Unknown Facts : शाहरुख खान आणि काजोलची मुख्य भूमिका असलेला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमाबाबत एक फारशी माहित नसलेली गोष्ट समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Dilwale Dulhaniya Le Jayenge : काजोल आणि शाहरुख खान याची मुख्य भूमिका असलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि हा सिनेमा आजही सगळ्यांचा लाडका आहे. नव्वदच्या दशकात अतिशय गाजलेल्या या सिनेमातील शाहरुखने सांगितलेली राज ही भूमिका गाजली. पण तुम्हाला माहितीये का ? या भूमिकेसाठी शाहरुख या सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांची पहिली निवड नव्हती.

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा सिनेमा जेव्हा आदित्य चोप्रा यांनी लिहिलीय तेव्हा त्यांनी हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझला डोळ्यासमोर ठेवून लिहिला होता. आदित्य यांना दोन संस्कृतींवर भाष्य करणारी प्रेमकथा सिनेमात दाखवायची होती. एक अमेरिकन तरुण आणि भारतीय तरुणी यांची प्रेमकथा त्यांना दाखवायची होती. पण त्यांचे वडील यश चोप्रा यांनी त्यांना सल्ला दिला कि, तू स्क्रिप्ट पुन्हा लिही. त्यांनी त्यांच्या वडिलांचा सल्ला ऐकलं आणि पुढे शाहरुख खान आणि काजोल या जोडीचा हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील अजरामर सिनेमा ठरला. हा किस्सा अनुपमा चोप्रा यांनी त्यांच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे : द मेकिंग ऑफ या ब्लॉकबस्टर' या पुस्तकात सांगितला आहे. काजोलने देखील एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाने नव्वदच्या दशकात २०० करोड रुपयांची कमाई केली होती. या सिनेमात शाहरुख आणि काजोल बरोबर फरीदा जलाल, अमरीश पुरी, अनुपम खेर, सतीश शाह, मंदिरा बेदी, परमीत सेठी यांची मुख्य भूमिका होती. या सिनेमाने त्या काळी १० फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: देश-विदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT