ulajh teaser out
ulajh teaser out ESAKAL
Premier

Ulajh Teaser Out: 'गद्दारी की कीमत जान से चुकाई जा सकती है'; जान्हवी कपूरच्या 'उलझ'चा टीझर रिलीज

priyanka kulkarni

Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. जान्हवीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच आता जान्हवीच्या 'उलझ' (Ulajh) या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

जान्हवीनं शेअर केला टीझर

'उलझ' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात जान्हवी तरुण आयएफएस अधिकारी सुहानाची भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात गुलशन देवैया आणि रोशन मॅथ्यू यांच्याही भूमिका आहेत. जान्हवीनं 'उलझ' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "लबाडी, फसवणूक आणि विश्वासघाताच्या जगात प्रवेश करा"

जान्हवीच्या अभिनयाचं अनेकांनी केलं कौतुक

उलझ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सस्पेंस आणि थ्रिलर पहायला मिळत आहे. "गद्दारी की कीमत सिर्फ जान से चुकाई जा सकती है।" या 'उलझ' चित्रपटाच्या टीझरमधील डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच टीझरमधील जान्हवीच्या अभिनयाचं देखील अनेकजण कौतुक करत आहेत.

कधी रिलीज होणार 'उलझ'?

'उलझ' हा चित्रपट 5 जुलै थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधांशू सारिया यांनी केले आहे. या चित्रपटात आदिल हुसैन, राजेश तैलंग, मियांग चांग, ​​राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी या कलाकारांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे निर्माते विनीत जैन आहेत. 'उलझ' या चित्रपटात एका तरुणीची गोष्ट दाखवली जाणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

जान्हवीचे आगामी चित्रपट

'उलझ' या चित्रपटाबरोबरच जान्हवी ही 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती वरुण धवनसोबत दिग्दर्शक शशांक खेतानच्या 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटात दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrirang Barne: "अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही"; श्रीरंग बारणेंची खदखद

Latest Marathi News Live Update: ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.08 टक्के..

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

SCROLL FOR NEXT