Varsha Usgaonkar 
Premier

Bigg Boss Marathi Varsha Usgaonkar: वर्षा उसगावकर 'बिग बॉस'च्या घराबाहेर; टॉप 6 सदस्य झाले निश्चित

Varsha Usgaonkar outside Bigg Boss house: आता बिग बॉसमध्ये एकूण सहा सदस्य राहिले आहेत. आज कोण घराबाहेर जाणार याकडे महाराष्ट्रातील बिग बॉस प्रेमींचे लक्ष लागले होते.

कार्तिक पुजारी

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी ५' मधून आज शेवटचं एव्हिक्शन झालं आहे. मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर या अपेक्षेप्रमाणे 'बिग बॉस'च्या घराबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे आता बिग बॉसमध्ये एकूण सहा सदस्य राहिले आहेत. आज कोण घराबाहेर जाणार याकडे महाराष्ट्रातील बिग बॉस प्रेमींचे लक्ष लागले होते.

वर्षा उसगावकर आणि जान्हवी किल्लेकर यांना सगळ्यात कमी वोट मिळाले होते. एव्हिक्शनमध्ये सर्वात कमी वोट्स वर्षा उसगावकर यांना मिळाल्याचे समोर आले होते. त्यामुळे वर्षा उसगावकर यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर व्हावं लागलं आहे. शेवटचं एव्हिक्शन असल्याने आज बिग बॉसला सिझनमधील टॉप ६ स्पर्धक भेटले आहेत. हे सर्व स्पर्धक आता थेट अंतिम फेरीत गेले आहेत.

सगळ्यात जास्त वोटिंग सुरज चव्हाणला मिळाली आहे. त्यानंतर अंकिता वालावलकर हिचा क्रमांक लागतो. बिग बॉसमध्ये आता सुरज चव्हाण, अंकिता, अभिजित सावंत, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर हे सदस्य अंतिम फेरीमध्ये गेले आहेत. सहा ऑक्टोबर रोजी सीझनचा ग्रँड फिनाले होणार आहे. या दिवसाची अनेकजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Wedding Card : टीपू सुलतान प्रेरणास्थान, शिवरायांचाही उल्लेख; अमरावतीतील लग्नपत्रिका व्हायरल...

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ३० तास पाणीपुरवठा ठप्प, 'या' सहा विभागातील जलवाहिनी बंद होणार; कधी? वाचा सविस्तर

Navi Mumbai Drug Racket : शांताबाई करंडेकर टोळीचा गेम ओव्हर! दिघ्यात लेडी डॉनचं साम्राज्य उद्ध्वस्त करत पोलिसांनी अवैध मालमत्तेवर फिरवला बुलडोझर

OCI Card New Rule: नागरिकत्व नियमांत मोठा बदल! अल्पवयीन मुलांच्या पासपोर्टवर मोठी बंदी; OCI साठी नवे डिजिटल नियम लागू

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे यांची भूमिका दिवसेंदिवस बदलत जाते- प्रताप सरनाईक

SCROLL FOR NEXT