bigg boss ott season 3 Esakal
Premier

Video : "त्याला बाहेर काढा !" ; 'त्या' घटनेनंतर विशाल पांडेंच्या आई-वडिलांची बिग बॉसला विनंती

Vishal Pandey's parents special request to Bigg Boss : विशाल पांडेच्या बाबतीत बिग बॉसमध्ये घडलेल्या त्या घटनेनंतर विशालच्या आई-बाबांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बॉसला विनंती केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Ott Season 3 : कलर्स टीव्ही हिंदीवरील बिग बॉस ओटीटी सीजन ३ खूप गाजतोय. “भाभी अच्छी लगती है”, या विशाल पांडेने केलेल्या विधानानंतर बरेच वादविवाद झालेले पाहायला मिळाले. कृतिकाबद्दल विशालने केलेल्या या विधानामुळे चिडलेल्या अरमान मलिकने त्याच्या कानाखाली मारली. यानंतर संपूर्ण मलिक कुटूंबावर सर्व स्तरातून टीका होत आहे. अनेक कलाकारांनी विशालला सपोर्ट केला यातच विशालच्या आई वडिलांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत बिग बॉसकडे विनंती केली.

विशालच्या आई-वडिलांचा व्हिडीओ

विशाल पांडेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या आई-वडिलांनी एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हंटलं कि," ‘बिग बॉस’ माझी तुम्हाला विनंती आहे की, त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढा, ज्याने माझ्या मुलावर हात उचलला. आजपर्यंत आम्ही त्याच्यावर हात उचलला नाही. आम्ही त्याला प्रेमाने वाढवलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात कोणी त्याच्यावर हात उचलेल, असा विचार देखील केला नव्हता. आम्हाला आता सहन होत नाहीये. मी जेव्हापासून हे ऐकतेय, तेव्हापासून खूप त्रास होतोय."

यानंतर विशालचे वडील म्हणाले कि,"आमचा व्हिडीओ बनवण्याचा मागचा हेतू हाच आहे की, काल जो एपिसोड आला होता. त्यात दाखवण्यात आलं की, विशाल स्वतःला फेक दाखवत आहे वगैरे. पण विशाल जे आहे तेच तो तिथे दाखवत आहे. त्याचा एकच मुखवटा आहे, दोन किंवा तीन नाही. तो जसा आहे तसाच तो तिथे दिसत आहे. दुसरा मुद्दा त्याच्यावर चुकीचे आरोप लावले जात आहेत. माझ्या मुलाचा स्वभावही तसा नाहीये. तुम्ही बोलला की, सगळेच आई-वडील असं म्हणतात. पण तसं नाहीये. काहीजण म्हणत आहेत, विशालने समोर बोललं पाहिजे होतं. तर तुम्ही व्हिडीओ नीट पाहा. विशालने ती गोष्ट कृतिकासमोर बोलली आहे की, ‘वहिनी तू बिना मेकअपही सुंदर दिसते.' एखाद्याचं कौतुक करणं हे माझ्या मते चुकीचं नाहीये."

"अरमानने माझ्या मुलाला जी कानशिलात लगावली. त्याप्रकरणी माझी बिग बॉसला, निर्मात्यांना हात जोडून विनंती आहे की, अरमानला घराबाहेर काढा. आमचं कुटुंब असं नाहीये. आम्ही खूप साधी माणसं आहोत. माझा मुलगा मेहनतीने तिथंपर्यंत पोहोचला आहे. कोणाच्या पाठिंब्याने तो तिथे पोहोचला नाहीये. स्वतःच्या मेहनतीने त्यानं सगळं मिळवलं आहे आणि मला त्याचा गर्व आहे. त्यामुळे मी बोलने की, विशाल काळजी करू नको. आम्ही तुझ्याबरोबर आहोत." असंही ते पुढे म्हणाले.

काय घडलं नेमकं ?

बिग बॉस ओटीटीच्या मागील एपिसोडमध्ये अरमानची पहिली बायको पायलने हजेरी लावत विशालवर आरोप केले कि, त्याने दुसऱ्या स्पर्धकाच्या कानात कृतिकाविषयी कमेंट केली कि,"भाभी खूप चांगली दिसते. " तिच्या या आरोपानंतर विशालने त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण कुणी ऐकून घेतलं नाही. नंतर चिडलेल्या अरमानने त्याच्या कानाखाली मारली. जेव्हा खरा व्हिडीओ समोर आला तेव्हा "भाभी खूप चांगली दिसते. मी चांगल्या अर्थाने सांगतोय." असं म्हंटलं होतं. एका अर्थी त्याने कौतुक केलंय असा अर्थ सगळ्यांनी काढला असून पायल आणि अरमान उगाच त्याला चुकीचा दाखवण्याचा प्रयत्न केला असं सगळ्यांचं म्हणणं आहे. यावरून त्यांच्यावर टीका होतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT