Jatraa Movie eSakal
Premier

Jatraa Movie: "मला नागीणसारखे कपडे..."; 'कोंबडी पळाली' गाण्यातील कॉस्च्युममुळे क्रांतीने अंकुशला झापलं

Kranti Redkar Shared Jatra Movie Memory: अभिनेत्री क्रांती रेडकरने जत्रा सिनेमाचा खास किसा नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शेअर केला. काय म्हणाली क्रांती जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Kranti Redkar : केदार शिंदे दिग्दर्शित जत्रा या सिनेमाची एक वेगळी क्रेझ पूर्वीपासून प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहेत. नुकतीच या सिनेमाला १७ वर्षं पूर्ण झाली पण आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनामध्ये त्याच स्थान टिकवून आहे. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर आणि प्रिया बेर्डे यांची मुख्य भूमिका या सिनेमात होती. ह्यालागाड आणि त्यालागाड गावातील पिढ्यानपिढ्या चालणारी दुश्मनी आणि त्यात फसलेले एक सारखे दिसणारे दोन तरुण यांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळाली.

नुकतंच अभिनेत्री क्रांती रेडकरने कांचन अधिकारी यांच्या युट्युब चॅनेलवरील  ‘बातों बातों में’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने या सिनेमाविषयीचे अनेक किस्से शेअर केले. जत्रा सिनेमातील तिच्यावर चित्रित झालेलं गाजलेलं गाणं 'कोंबडी पळाली'चा खास किस्सा तिने शेअर केला. ती म्हणाली,"‘कोंबडी पळाली’ गाण्यात थोडा दाक्षिणात्य स्टाईलचा नाच करायचा होता आणि माझा रावडी बाज आहे असं मला वाटतं. पहिल्यांदा जेव्हा मी गाणं ऐकलं होतं तेव्हा मला काहीच कळलं नव्हतं. मी तालमीला पोहोचले त्यांनी मला गाणं ऐकवलं. नुसतं धडधड वाजत होतं. मी म्हटलं, एक मिनिट, हे किती फास्ट गाणं आहे. मग त्या गाण्याच्या डान्सची तालीम झाली. उमेश जाधवने दोन दिवस तालीम घेतली आणि मग ज्या दिवशी चित्रिकरण होतं, त्यादिवशी माझ्या गाण्यातला कॉस्च्युम आलाच नव्हता. अंकुश त्यावेळी हा सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शन करत होता आणि त्याने माझा या सिनेमातील कॉस्च्युम डिझाईन केला होता. गाण्याचं आधीच शुटींग सुरू झालं होतं. माझा कॉस्च्युम दोन वाजेपर्यंत तिथे पोचला नव्हता. मी मेकअप रूममध्ये रडत होते. कॉस्च्युम वेळेत न पोहोचल्यामुळे मी अर्ध्या गाण्यात दिसत नाहीये. त्यानंतर दोन वाजता कॉस्च्युम आला. अंकुशला आम्ही खूप झापलं होतं. याला काय अर्थ आहे? कोंबडीच्या गाण्याला नागिणचा ड्रेस? पूर्ण कॉस्च्युम काळ्या रंगाचा का… वगैरे? त्याने मला तेव्हाच सांगितलं, नंतर हेच कपडे घालून लोक याच गाण्यावर परफॉर्म करणार शाळा आणि कॉलेजमध्ये… तू बघच. आणि तेच घडलं. "

पुढे ती म्हणाली कि,"जेव्हा ती गडबड झाली तेव्हा मी खूप रडायला लागले होते. तेव्हा अंकुश म्हणाला, काही नाही होणार. तुझा कॉस्च्युम येणार. तू शांत हो. तुझं छान होणार वगैरे आणि अंकुशने ती सगळी परिस्थिती सांभाळली. तो खरंच खूप गोड मनाचा माणूस आहे."

आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं हे गाणं सुपरहिट झालं. तर सिनेमालाही उत्तम यश मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : गमावलेलं प्रेम काही तासात मिळवा, ब्रेकअपनंतर १८ वर्षीय तरुणी जाहिरातीला भुलली; टोळीने १३ तोळे दागिने अन् ३ लाख लुबाडले

अधिकाऱ्यांसमोर 'पुष्पा'चा माज उतरला! अल्लू अर्जुनने विमानतळावर असं काय केलं? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : थोड्याच वेळात इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा

Audi A9 Chameleon Car : 100,00,00,000 रुपयांची कार! नीता अंबानीने खरेदी केली रंग बदलणारी ऑडी; जबरदस्त फीचर्स पाहा एका क्लिकवर

Ahilyanagar News: पारनेर दूध संघावर ‘जनसेवा’चा झेंडा; डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली १२ जागांवर विजय

SCROLL FOR NEXT