rajat dalal esakal
Premier

Bigg Boss 18: कॅरी मिनाटीसोबत पंगा अन् किडनॅपिंगचा आरोप; कोण आहे 'बिग बॉस १८' मध्ये आलेला रजत दलाल? संपत्तीचा आकडाही मोठा

Who Is Rajat Dalal Entered In Bigg Boss 18: 'बिग बॉस १८' मध्ये सहभागी झालेल्या एका सदस्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे त्याची भांडण करण्याची आवड.

Payal Naik

'बिग बॉस १८' मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्यांबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र त्यात सगळ्यात जास्त चर्चेत आहे तो युट्यूबर रजत दलाल. रजत हा पॉवर लिफ्टिंगदेखील करतो, त्याने १४ मेडल्स जिंकली आहेत. तो पर्सनल जिम ट्रेनरदेखील आहे. मात्र तो सोशल मीडियावर तेव्हा नजरेत आला जेव्हा त्याची भांडणं व्हायरल होऊ लागली. मला भांडणं करायला आवडतं असं तो बिग बॉस १८ मध्ये येताच म्हणाला. युट्यूबर कॅरी मिनाटीसोबत पंगा घेण्यापासून ते साधूच्या वेशात असलेल्या लोकांना मारहाण करण्यापर्यंत त्याचे बरेच किस्से प्रचंड गाजले आहेत.

रजत दलाल आणि कॉंट्रोव्हर्सी यांचं फार जुनं नातं आहे. चाहते रजत दलाल याला हल्क, गुल्लू आणि रज्जो असंही म्हणतात. तो जिममध्ये पर्सनल ट्रेनरही आहे. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1996 रोजी हरियाणातील फरिदाबाद येथे झाला. तो 28 वर्षांचा आहे. या २८ वर्षात त्याने अनेक लोकांशी पंगा घेतला आहे. त्याने 'बिग बॉस 18' मध्ये सलमान खानसमोर खुलासा केला की, कॅरी मिनाटीने त्याच्यावर रोस्ट व्हिडिओ बनवला होता, त्यानंतर त्याने त्याच्याशी पंगा घेतला होता. नंतर कॅरीने व्हिडिओ एडिट केला आणि तो फक्त मस्करी करत होता असं सांगितलं.

२०२३ मध्ये रजतने दोन बाबांना पकडलं होतं ज्यांना त्याने हनुमान चालीसा बोलायला सांगितली मात्र त्यांना ते आलं नाही. त्यांनी आपण गोरखनाथ पिठातील नाथ संप्रदाय येथील असल्याचं सांगितलं होतं मात्र ते दोघेही खोटे होते. जेव्हा पोलिसांनी त्यांचं आधार कार्ड पाहिलं तेव्हा ते खोटं होतं. एका सौरव कुमार नावाच्या व्यक्तीने रजत चांगला पॉवर लिफ्टर नसल्याचं म्हटलं होतं तेव्हा रजतने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. ती इतक्यावरच थांबला नाही तर तो आपल्या मित्रांसोबत देहरादूनला गेला आणि सौरभ आणि त्याच्या मित्रांना मारलं. त्यानंतर सौरभ आणि त्याच्या मित्रांनी इंस्टाग्राम सेशनवर रजतची माफी मागितली होती. आणि माफीनाम्यावर सहीदेखील केली होती.

रजत आणि राजवीर यांची लढाई

राजवीर सिसोदिया नावाच्या व्यक्तीने रजतवर आरोप केला होता की रजतने त्याच्या आणि बिल्डर नितीन चंदेला याच्याबद्दल अपशब्द काढले आहेत. त्यानंतर राजवीरने रजतला फरिदाबादमध्ये येण्याचं आव्हान दिलं होतं. जेव्हा रजत आला नाही तेव्हा राजवीर स्वतः त्याच्या घरी गेला. त्यानंतर रजतने त्याला राजवीरशी कोणतंही वैर नसल्याचं म्हटलं होतं. यात राजवीर जिंकला होता हे स्पष्ट होतं.

१८ वर्षाच्या मुलाचं केलं अपहरण

राजवीरने एका व्हिडिओमध्ये सांगितलं की एका स्पर्धेला जाताना ट्रेनमध्ये रजत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरत होता. तेव्हा तो पकडला गेला आणि त्याला लोकांनी चांगलाच चोप दिला. २०२४ मध्ये रजतवर एका १८ वर्षाच्या मुलाला किडनॅप केल्याचा आरोप करण्यात आला. या मुलाने त्याच्या व्हिडिओमध्ये रजतने आपला चेहरा दाखवून माझा सगळा दिवस खराब केला असं म्हंटलं होतं. यानंतर रजतने दोन मुलांच्या मदतीने त्यांना किडनॅप केलं आणि त्याला खूप त्रास दिला.

दुचाकीला कारने धडक दिली

ऑगस्ट 2024 मध्ये रजतचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो ताशी 140 किलोमीटर वेगाने कार चालवताना दिसत होता. हायवेवर गाडी चालवत असताना त्याने एका दुचाकीस्वाराला धडक दिली आणि त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेने त्याला सावधपणे गाडी चालवण्यास सांगितलं, तेव्हा त्याने सांगितलं की तो सावधपणे गाडी चालवत आहे. तो म्हणाला, 'तो पडला, काही फरक पडत नाही. हे माझं रोजचं काम आहे, मॅडम.

रजत दलाल नेट वर्थ

रजतच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर त्याने अजून लग्न केलेलं नाही. त्याच्या वडिलांचे नाव मोहिंदर सिंग दलाल आहे. त्याला एक भाऊ मुकेश आणि एक बहीण नीरू आहे. नीरू ऑस्ट्रेलियात राहते. 2024 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 25 कोटी 18 लाख 84 हजार 800 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT